advertisement

नीता अंबानी यांना Humanitarian Award 2025 प्रदान; शिक्षण,आरोग्य क्षेत्रातील कामाच्या योगदानाबद्दल गौरव

Last Updated:

नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाउंडेशनने शिक्षण, क्रीडा, आरोग्य, ग्रामीण विकास, कला-संस्कृती आणि महिला सशक्तीकरण अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे.

News18
News18
भुवनेश्वर : रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस कडून ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना हा पुरस्कार सामाजिक सेवा आणि विकास क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानासाठी देण्यात आला.  हा पुरस्कार नीता अंबानी यांना प्राध्यापक मोहन मुनासिंघे आणि डॉ. अच्युत सामंता यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम भुवनेश्वरमधील KISS कॅम्पसमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी उपस्थितीत होते.
नीता अंबानी यांना हा पुरस्कार त्यांच्या रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामांची दखल घेऊन देण्यात आला. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाउंडेशनने शिक्षण, क्रीडा, आरोग्य, ग्रामीण विकास, कला-संस्कृती आणि महिला सशक्तीकरण अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. देशभरातील लाखो लोकांपर्यंत या उपक्रमांचा फायदा पोहोचला आहे, ज्यामुळे समाजातील दुर्बल वर्गांना थेट मदत मिळाली आहे.
advertisement
या कार्यक्रमात सुमारे 40 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने नीता अंबानी यांचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादर करून आपला आनंद आणि सन्मान व्यक्त केला. संपूर्ण वातावरण उत्साह आणि अभिमानाने भरलेले होता, ज्यामुळे हा सन्मान आणखी खास झाला.
कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही जगातील सर्वात मोठी आदिवासी शिक्षण संस्थान मानली जाते. इथं हजारो आदिवासी मुलांना मोफत शिक्षण, निवास, जेवण आणि कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. या संस्थेचा उद्देश समाजातील मागास वर्गांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करणे आहे. हा सन्मान केवळ वैयक्तिक उपलब्धी नाही तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच CSR च्या कामांना देखील ओळख देतो.
advertisement
नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सामाजिक कार्यांनी हे दाखवून दिलं आहे की, कॉर्पोरेट क्षेत्रही समाजात मोठा बदल घडवू शकतो. एकूणच, हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक योगदानाचा आणि समाजासाठी असलेल्या त्यांचा वचनबद्धतेचा मोठा गौरव समजला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
नीता अंबानी यांना Humanitarian Award 2025 प्रदान; शिक्षण,आरोग्य क्षेत्रातील कामाच्या योगदानाबद्दल गौरव
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement