Virar Crime News : विरारमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली मानवी वीर्याची बेकायदेशीर साठवणूक आणि तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या धडक कारवाईत हा प्रकार समोर आला असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचे धागेदोरे परराज्यातही पसरले असल्याची माहिती समोर येत आहे.



