advertisement

स्वामी समर्थ भक्तांसाठी एक सुवर्णयोग, पुण्यात सूर्यमणी आणि पादुकांचे घेता येणार दर्शन, काय आहे महात्म्य?

Last Updated:

श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी एक सुवर्णयोग जुळून आला आहे. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या पवित्र सूर्यमणी आणि पादुकांचे दर्शन घेता येणार आहेत.

+
स्वामींच्या

स्वामींच्या सूर्यमणीचे महत्त्व काय ? 

पुणे: श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी एक सुवर्णयोग जुळून आला आहे. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या पवित्र सूर्यमणी आणि पादुकांचे दर्शन घेता येणार आहेत. या पवित्र वस्तू आजही महाराजांच्या लीलांशी जोडलेल्या आहेत. या पवित्र सूर्यमणी आणि पादुका दर्शनासाठी 17 मार्च आणि 18 मार्चला संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत, तर 19 मार्चला सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सिद्धी साज बँक्वेट, डी. पी. रस्ता, एरंडवणे या ठिकाणी भक्तांना या पवित्र वस्तूंचे दर्शन घेता येणार आहेत. या सूर्यमणीचं महात्म्य काय आहे ? याविषयीची माहिती प्रसाद पांडे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
देशभरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त पाहायला मिळतात. पुण्यातील प्रसाद पांडे देखील अनेक वर्षांपासून स्वामींचे निस्सीम भक्ती करत आहेत. आकुर्डी येथील छत्रपती संभाजीनगरमधील त्यांचा पहिला मठ असून, त्या मठात स्वामींची नित्यनेमाने सेवा केली जाते. पांडे यांनी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र सूर्यमणीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार स्वामींच्या हातातील हा सूर्यमणी हा ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. ती पाहताना भक्तांना केवळ आध्यात्मिक ऊर्जा नाही, तर ब्रह्मांडाच्या अद्भुततेची अनुभूती देखील मिळते.स्वामी त्या सूर्यमणीच्या माध्यमातून ब्रह्मांडावर कठपुतळीप्रमाणे नियंत्रण करतात आणि अनेक लीला घडवतात, अशी माहिती पांडे यांनी दिली.
advertisement
प्रसाद पांडे यांच्याकडे गेल्या 35 वर्षांपासून स्वामींची मनोभावे सेवा केली जाते. त्यांच्याकडे स्वामींच्या पादुका देखील आहेत. स्वामींची ही सेवा दररोज केली जाते, पण गुरुवारी विशेषतः भक्तांना स्वामी नेमके कसे होते याचे वर्णन केले जाते. परिसरातील अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. आता होणाऱ्या सोहळ्यात पुण्यात प्रथमच स्वामींच्या पवित्र सूर्यमणी आणि पादुका दर्शनाचा लाभ पुणेकरांनी तसेच स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे पांडे यांनी आवाहन केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
स्वामी समर्थ भक्तांसाठी एक सुवर्णयोग, पुण्यात सूर्यमणी आणि पादुकांचे घेता येणार दर्शन, काय आहे महात्म्य?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement