advertisement

इराणच्या नॅशनल सिक्युरिटी चीफची हत्या, अली लारीजानी यांचा भयानक अंत; इस्रायलने थेट तेहरानमध्ये घुसून केली शिकार

Last Updated:

Iran-Israel Conflict: इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अली लारीजानी यांच्या हत्येचा दावा समोर येताच तणाव आणखी वाढला आहे. तेहरानमधील हवाई हल्ल्यानंतर या घटनेबाबत अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.

News18
News18
तेहरान : इराणमधील अत्यंत प्रभावशाली नेत्यांपैकी एक आणि अयातुल्ला अली खामेनेई यांचे निकटवर्तीय तसेच राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त AFPने दिले आहे. त्याआधी इस्रायलचे संरक्षणमंत्री यांनी मंगळवारी अली लारीजानी हे ठार झाल्याचे जाहीर केले.
प्राथमिक अहवालांनुसार लारीजानी यांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. मात्र ते मृत्युमुखी पडले की जखमी झाले याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. या घटनेबाबत अद्याप इराणी अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
दरम्यान इराणचे वरिष्ठ कमांडर घोलमरेझा सोलेमानी यांनाही इस्रायली हवाई हल्ल्यात ठार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायली वायुसेनेने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार अचूक गुप्त माहितीच्या आधारे तेहरानच्या मध्यभागी हल्ला करून मागील सहा वर्षांपासून बसीज युनिटचे नेतृत्व करणाऱ्या घोलामरेझा सोलेमानी यांचा अंत करण्यात आला.
advertisement
इराणमधील युद्ध आज 18व्या दिवशी पोहोचले आहे. सोमवारी अली लारीजानी यांनी मुस्लिम देशांना उद्देशून एक संदेश लिहिला होता. ज्यामध्ये त्यांनी इराणला मिळत नसलेल्या समर्थनाबाबत प्रश्न उपस्थित केले. अमेरिका-इस्रायल युद्ध तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना याचा शेवट कधी होईल हे अद्याप स्पष्ट नाही.
या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून जागतिक महागाई वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
advertisement
जगभरातील मुस्लिम समाज आणि इस्लामी देशांच्या सरकारांना उद्देशून दिलेल्या आपल्या संदेशात लारीजानी यांनी म्हटले की, इराणवर अमेरिकन-झायनिस्ट आक्रमण करण्यात आले आहे. त्यांनी असा दावा केला की या हल्ल्यांमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह लष्करी अधिकारी आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
लारीजानी यांनी पुढे असेही म्हटले की, या आक्रमकांना इराणच्या जनतेकडून ठाम राष्ट्रीय आणि इस्लामी प्रतिकार मिळत आहे. तसेच सुरू असलेल्या संघर्षात मुस्लिम देशांनी इराणला ठोस पाठिंबा का दिला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणच्या नॅशनल सिक्युरिटी चीफची हत्या, अली लारीजानी यांचा भयानक अंत; इस्रायलने थेट तेहरानमध्ये घुसून केली शिकार
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement