एप्रिलमध्ये सोन्याच्या किंमती गगणाला भिडणार! 1.75 लाख रुपयांच्या पार जाणार भाव?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सोनं-चांदीच्या किंमतीत सध्याच्या काळात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळतोय. 2026 वर्षी तर सोन्याने विक्रमी स्तर गाठले आहेत. आता एप्रिलमध्येही सोन्याच्या किंमती वाढतील असा अंदाज आहे. चला पाहूया डिटेल्स...
मुंबई : सोनं-चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उलथा-पालथी पाहायला मिळताय. सोन्याच्या भावात थोडी-फार घसरण जरी झाली असली तरीही सोनं हे पूर्वीच्या तुलनेत तेजीतच आहे. याच कारणामुळे भारतीय गुंतवणूकदार आणि खरेदीरांच्या मनात मोठा प्रश्न आहे. सोन्याचा भाव एप्रिल 2026 मध्ये कुठपर्यंत जाईल असा प्रश्न आहे.
advertisement
सध्या मार्च 2026 मध्ये सोन्याचा भाव तेजीतच आहे. 24 कॅरेट सोनं (10 ग्राम) हे जवळपास 1,58,000 ते 1,59,000 रुपयांच्या आसपास सुरू आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,45,000 रुपयांच्या जवळपास आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये सोन्यात जबरदस्त वाढ दिसली. येथे ग्लोबल लेव्हलवर किंमत 2,600 डॉलरने वाढून 5,000 डॉलर प्रति औंसच्या पार गेल्या आहेत. भारतातही मागणी वाढली आहे.
advertisement
इकॉनॉमिक टाइम्सचे विशेषज्ञ आणि अॅनालिस्ट्स यांनी सांगितल्यानुसार, एप्रिल 2026 मध्ये सोन्याच्या किमंती स्थिर राहणे किंवा थोड्या वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये भारतात उन्हाळा सुरू होतो. लग्नसराई थोडी कमी असते. यामुळे देशांतर्गत मागणी थोडी कमी होऊ शकते. मात्र जागतिक फॅक्टर मजबूत आहे. उदाहरणार्थ, यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी होण्याची अपेक्षा, भू-राजकीय तणाव (मध्य पूर्व, युक्रेन इत्यादी ठिकाणी), आणि महागाईपासून संरक्षण म्हणून सोन्याची मागणी, या घटकांमुळे किमती कमी होणार नाहीत.
advertisement
अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलेय की, 2026 मध्ये सोन्याची सरासरी किंमत भारतात 1.5 लाख ते 1.75 लाख रुपये प्रति 10 ग्राम (24 कॅरेट) पर्यंत जाऊ शकतात. एप्रिलमध्ये ही रेंज 1,55,000 ते 1,65,000 रुपयांदरम्यान राहू शकते. काही अॅनालिस्ट्सचा अंदाज आहे की, जागतिक अनिश्चितता वाढली तर किंमत 1,70,000 रुपयांच्या पारही जाऊ शकतात. मात्र अमेरिकी डॉलर मजबूत झाला किंवा फेडने व्याजदर कमी केले नाही तर थोडी घसरण होऊ शकते.
advertisement
advertisement
दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये एप्रिल महिन्यासाठी 24-कॅरेट सोन्याचे अपेक्षित दर प्रति ग्रॅम 15,500 रुपये ते 16,500 रुपये (प्रति 10 ग्रॅम 1,55,000 ते 1,65,000) राहण्याची शक्यता आहे. 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 14,200 ते 15,100 असेल. असाही अंदाज आहे की, खऱ्या किंमती या बाजारातील परिस्थितीनुसार बदलू शकतात. स्थानिक कर, मेकिंग चार्ज आणि जीएसटी यांचाही यात समावेश असतो.
advertisement
सोन्याची किंमत वाढण्याची प्रमुख कारणं हे कमजोर अमेरिकन डॉलर, सेंट्रल बँकांची खरेदी, जियोपॉलिटिकल रिसक् आणि इन्फ्लेक्शनपासून बचाव आहे. 2025 मध्ये सोन्याने 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिलंय. 2026 मध्येही हे मजबूत राहू शकते. मात्र रॅलीची स्पीड कमी होऊ शकते. अॅनालिस्ट्स म्हणतात की, सोनं दीर्घकाळासाठी चांगली गुंतवणूक आहे.
advertisement
advertisement







