Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! CSMT कडे जाणाऱ्या लोकल ठप्प
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ऐन संध्याकाळच्या वेळेत मुंबई लोकलची वाहतुक ठप्प झाली. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या आहेत. यामुळे घरी जाण्यासाठी नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
ऐन संध्याकाळच्या वेळेतच मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा ते चिंचपोकळी स्थानकादरम्यान, लोकल सेवा रखडली असल्याची माहिती मिळत आहे. 15 ते 20 मिनिटे लोकलचा खोळंबा झाल्याची माहिती आहे. चिंचपोकळी ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळ ओलांडत असताना एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झालेली आगे. नोकरदारांचा ऐन घरी जाण्याच्या वेळेतच लोकलचा खोळंबा झाला आहे.
चिंचपोकळी आणि भायखळा या दोन रेल्वे स्टेशनच्या दरम्यानच रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे. यामुळे ऐन संध्याकाळच्या वेळीच प्रवासी घरी जात असताना प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची ही वेळ झालेली असते. संध्याकाळच्या वेळी अनेक कर्मचारी घरी जाण्याच्या घाईमध्ये असतात. त्याचवेळी, मुंबई लोकलचा खोळंबा झालेला आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाल्यामुळे आता सहाजिकच नोकरदारांना घरी जाताना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
advertisement
गेल्या काही वर्षांपासून आरपीएफ पोलिसांकडून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाते. मध्य रेल्वेवरील अनेक मुख्य रेल्वे स्थानकांवर आरपीएफ पोलिसांचा गस्त आपल्याला पाहायला मिळतो. लवकरात लवकर लोकल कशा पद्धतीने आपल्या मिळेल, अशी धावपळ अनेक प्रवासी करत असतात. कायमच आरपीएफ पोलिसांकडून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 4:43 PM IST








