चिली देशातील एका साध्या गृहस्थाच्या आयुष्यात घडलेली ही घटना जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. एक्सेसिल हिनोजोसा नावाच्या व्यक्तीने आपल्या घराची स्वच्छता करत असताना अचानक आपल्या दिवंगत वडिलांचे जुने बँक पासबुक सापडले आणि त्याच क्षणी त्यांच्या आयुष्याने अविश्वसनीय वळण घेतले.
advertisement
कचऱ्यातून सापडलेले भाग्य
एक्सेसिल हिनोजोसा हे चिली देशात राहतात. एका दिवशी ते आपल्या घराची साफसफाई करत होते. या दरम्यान त्यांना त्यांच्या वडिलांचे जुने बँक पासबुक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला. सुरुवातीला त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, कारण तो पासबुक 62 वर्षांपूर्वीचा होता आणि ज्या बँकेत खाते होते, ती बँक आता अस्तित्वातही नव्हती. परंतु काही वेळाने त्यांनी तो पासबुक उघडून पाहिला आणि त्यातील एका ओळीने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.
62 वर्ष जुना ठेवीचा इतिहास
या पासबुकनुसार त्यांच्या वडिलांनी 1960 ते 1970 च्या दशकात घर खरेदीसाठी सुमारे 1.40 लाख रुपये (त्या काळातील प्रचंड मोठी रक्कम) बँकेत जमा केली होती. पण त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील कुणालाही त्या खात्याबद्दल माहिती नव्हती.
काळ लोटला, बँक बंद पडली आणि ती गोष्ट विस्मरणात गेली. मात्र हिनोजोसा यांनी सापडलेले हे छोटेसे पासबुक म्हणजे त्यांच्या वडिलांच्या मेहनतीच्या पैशाचं चिन्ह होतं आणि तेच पुढे त्यांच्या आयुष्यातील सुवर्णपान ठरलं.
‘स्टेट गॅरंटी’ या शब्दांनी बदलली किस्मत
हिनोजोसा यांनी जेव्हा पासबुक बारकाईने पाहिले, तेव्हा त्यांच्या नजरेत एक ओळ ठळकपणे आली ती म्हणजे “State Guarantee”. या शब्दांचा अर्थ असा होता की, जर बँक दिवाळखोरीत गेली, तरी त्या खात्यातील रक्कम सरकारकडून हमीने परत केली जाईल. ही ओळ वाचताच हिनोजोसा यांना कळले की त्यांच्या वडिलांच्या ठेवीवर सरकारची जबाबदारी आहे आणि ती रक्कम त्यांना वारस म्हणून मिळू शकते.
न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
हिनोजोसा यांनी लगेचच न्यायालयात याबाबत अर्ज दाखल केला. त्यांनी म्हटलं, ही माझ्या वडिलांच्या कष्टाची कमाई आहे. बँक बंद झाली तरी सरकारची जबाबदारी आहे की हे पैसे त्यांच्या वारसाला दिले जावेत. त्यांचा मुद्दा न्यायालयाला पटला. न्यायालयाने बँक ठेवीवरील मूळ रक्कम आणि व्याजासह पूर्ण पैसे देण्याचा आदेश दिला.
एका रात्रीत करोडपती बनले
या निर्णयानंतर हिनोजोसा यांना जी रक्कम मिळाली ती होती तब्बल 9 कोटी रुपये. म्हणजेच घराच्या कचऱ्यात सापडलेल्या एका जुन्या पासबुकने त्यांना एका रात्रीत करोडपती बनवले.
