TRENDING:

पाकिस्तानचा नालायकपणा, भारतातील गायकाला आईचं अखेरचं दर्शन दिले नाही; WhatsApp वर पाहिला अंत्यसंस्कार

Last Updated:

Pakistan News: गायक-अभिनेता अदनान सामीने पाकिस्तानकडून आईच्या अंत्यसंस्कारासाठी व्हिसा नाकारल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. भारताचा नागरिक असलेल्या सामीला WhatsApp वरून आईचा जनाजा पहावा लागला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: प्रसिद्ध गायक-संगीतकार अदनान सामी ज्याने 2016 मध्ये पाकिस्तानचं नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारलं होते. त्याने आपल्या जीवनातील एक अतिशय वैयक्तिक आणि वेदनादायक प्रसंग उघड केला आहे. 'इंडिया टीव्ही'ला दिलेल्या एका मुलाखतीत पद्मश्री पुरस्कार विजेते सामी यांनी सांगितलं की, 2024 मध्ये त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तान सरकारनं व्हिसा नाकारला.
News18
News18
advertisement

अदनान सामी यांची आई बेगम नूरीन यांचं अचानक निधन झालं. त्यांना यापूर्वी कोणतेही गंभीर आरोग्यविषयक त्रास नव्हते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच अदनान यांनी त्वरित भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी संपर्क साधून जाण्याची परवानगी मागितली.

पुतिन यांचा राग नियंत्रणाबाहेर, तयार केले किल झोन; Mission Anaconda सुरू

भारतीय सरकारनं खूप समजूतदारपणे प्रतिसाद दिला, असे त्याने सांगितले. मी भारत सरकारला विचारलं की मी जायचं आहे, तुम्हाला काही आक्षेप आहे का? त्यांनी उत्तर दिलं – तुमच्या आईचे निधन झाले आहे. तुम्हाला नक्कीच जायला हवं. भारत सरकारच्या बाजूने काहीच अडचण नव्हती.

advertisement

मात्र जेव्हा अदनान पाकिस्तानकडे व्हिसासाठी अर्ज केला. तेव्हा प्रतिसादच मिळाला नाही. अखेर व्हिसा नाकारण्यात आला. मी व्हिसासाठी अर्ज केला. पण त्यांनी नकार दिला. मी सांगितलं की माझ्या आईचं निधन झालं आहे. तरीही त्यांनी मला जाऊ दिलं नाही. मी माझ्या आईचा पूर्ण जनाजा व्हॉट्सॲप व्हिडिओवर पाहिला.

इराणने ‘रेडलाईन’ ओलांडली, उचलले अजब पाऊल; जगाला मोठा धोका,अमेरिकेला फाट्यावर...

advertisement

लंडनमध्ये जन्मलेले अदनान सामी हे पाकिस्तान एअरफोर्सचे वैमानिक आणि राजनैतिक अधिकारी यांचे पुत्र आहेत. 2016 मध्ये त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं. अदनान सामीने याआधीही अनेकदा सांगितलं आहे की पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय वातावरणामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मुलगा पाकिस्तानमध्येच राहतो.

अनेकांनी अदनानचे भारतात स्थलांतर आर्थिक कारणांमुळे झालं असं सांगितलं होतं. पण त्यांनी हे स्पष्टपणे फेटाळलं. मी श्रीमंत कुटुंबात जन्मलो होतो. मी पाकिस्तानमध्ये कोट्यवधींची मालमत्ता सोडली आणि भारतात शून्यातून सुरुवात केली," असं त्याने सांगितलं. एका कलाकाराला प्रेक्षकांची गरज असते. प्रेक्षक हेच कलाकाराचं अन्न आहे. मला पाकिस्तानमध्येही प्रेम मिळालं, पण प्रत्येकालाच प्रगती हवी असते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

‘कभी तो नजर मिलाओ’ या गाजलेल्या गाण्यामुळे अदनान सामीने भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं. आशा भोसले यांच्यासोबतचं हे गाणं आजही लोकांच्या आठवणीत आहे.

मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानचा नालायकपणा, भारतातील गायकाला आईचं अखेरचं दर्शन दिले नाही; WhatsApp वर पाहिला अंत्यसंस्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल