आता रशिया 'शैतान' सोडणार का?
पुतीन काय उत्तर देतील याची भीती सगळ्या जगाला वाटतेय. कारण आता चर्चा सुरू आहे ती रशियाच्या अत्यंत विध्वंसक आणि घातक अस्त्राची म्हणजेच RS-28 SARMATची होय. ज्याला पश्चिमी देशांनी "सैतान-2 (Satan-2)" असं नाव दिलं आहे. हे अस्त्र केवळ युक्रेनच नव्हे तर संपूर्ण युरोप व अमेरिकेसाठीही धोकादायक ठरू शकते.
advertisement
काय आहे 'सैतान-2'?
RS-28 SARMAT ही रशियाची इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) असून ती साधारण 15 अण्वस्त्र वॉरहेड्स एकाच वेळी वाहून नेऊ शकते आणि वेगवेगळ्या टार्गेट्सवर मार करू शकते. याची लांबी 116 फूट, वजन 220 टन, तर श्रेणी 6,200 ते 11,180 मैलांपर्यंत आहे. म्हणजे ती थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते.
युक्रेनचा रशियात अंडरवॉटर ब्लास्ट; 1,100 किलो स्फोटकांनी मॉस्को हादरले
ही मिसाईल सोव्हिएत युगातील R-36 ICBM ची जागा घेण्यासाठी बनवण्यात आली असून तिचे नाव बदलून RS-28 SARMAT ठेवण्यात आले आहे. तिच्या क्षमतेवरून पश्चिमी देशांनीच तिला ‘सैतान’ असं नाव दिलं आहे.
शस्त्राशिवाय लढणारा रशिया
हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की, युद्धात इतक्या वर्षांपासून सामरिक ताकद वापरत असूनही रशियाने आजवर हे अति-विध्वंसक शस्त्र कधीही वापरलेलं नाही. पण आता युक्रेनने रशियाच्या हृदयात घुसून हल्ला केला आहे. त्यामुळे पुतीन यांच्या हातून 'सैतान' सुटणार का? हा प्रश्न जगाला सतावत आहे.
ऐतिहासिक क्षण, पुढचा एअर स्ट्राईक महाराष्ट्रातून होणार; नाशिकमध्ये सुपरफाइटर...
युक्रेनसाठी इशारा, जगासाठी चिंता
RS-28 SARMAT चा वापर झाला तर युक्रेनसाठी तो विनाशक असणार आहेच. पण त्याचे पर्यावरणीय, राजकीय आणि मानवी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. म्हणूनच जगभरात राजनैतिक हालचालींना वेग आला असून सगळ्यांचे लक्ष पुतीन काय निर्णय घेतात याकडे लागले आहे.