TRENDING:

हवेतच विमानात विचित्र आवाज, 300 प्रवाशांचा जीव टांगणीला, एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड

Last Updated:

विमानात 300 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानात बिघाड झाल्याने सगळ्यांचाच काळजात धस्स झालं. आता काय होणार याची भीती होते, प्रवासी देवाचा धावा करत होते, सारं काही सुखरुप पार पडू दे म्हणत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
6 तासांचं प्रवास झाला, काही हजार फूट उंचीवर विमान हवेत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. विमानात 300 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानात बिघाड झाल्याने सगळ्यांचाच काळजात धस्स झालं. आता काय होणार याची भीती होते, प्रवासी देवाचा धावा करत होते, सारं काही सुखरुप पार पडू दे म्हणत होते. विमान दिल्लीत येण्याऐवजी परस्पर आयर्लंडला वळवण्यात आलं.
News18
News18
advertisement

न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या आलिशान A350 विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. हवेत असतानाच विमानात अचानक व्हायब्रेशन्स आणि विचित्र आवाज येऊ लागल्याने पायलटने सेफ्टीसाठी म्हणून विमान आयर्लंडमधील शॅनन विमानतळाकडे वळवले. या विमानात ३०० प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा जीव धोक्यात न घातला तातडीनं त्याने हा निर्णय घेतला.

advertisement

नेमकं काय घडलं?

एअर इंडियाचे AI102 हे विमान १५ मार्च रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी निघाले होते. प्रवासाचे ६ तास पूर्ण होत असतानाच विमानात तांत्रिक समस्या जाणवू लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात अचानक व्हायब्रेशन्स जाणवू लागले आणि मोठ्या आवाजामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कोणतीही जोखीम न पत्करता वैमानिकाने तातडीने आयर्लंडच्या शॅनन विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला.

advertisement

एअर इंडियाची भूमिका

या घटनेबाबत एअर इंडियाने निवेदन दिलं आहे. "प्रवाशांच्या सुरक्षेसाठी म्हणून विमान डायव्हर्ट करण्यात आलं आहे. एअर इंडियाच्या उच्च सुरक्षा मानकांनुसार, सध्या या विमानाची कसून तांत्रिक तपासणी केली जात आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो," असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, ज्या विमानात हा बिघाड झाला, ते एप्रिल २०२४ मध्येच एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झालं होतं.

advertisement

प्रवाशांचे हाल; एअर इंडियाकडून सोय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

विमान आयर्लंडमध्ये उतरवल्यानंतर प्रवाशांना काही काळ विमानतळावरच थांबावे लागले. मात्र, एअर इंडियाने शॅनन विमानतळ प्रशासनाच्या मदतीने प्रवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय हॉटेलमध्ये केली आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, त्यांना लवकरात लवकर दिल्लीला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

मराठी बातम्या/विदेश/
हवेतच विमानात विचित्र आवाज, 300 प्रवाशांचा जीव टांगणीला, एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल