चढाईदरम्यान खोल दरीत पडली महिला पर्यटक
सोमवारीही बचाव पथकाने पुन्हा एकदा जूलियाना मरीन्स हिला पाहिले. पण खराब हवामानामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत सांगितले की, तिला गेल्या तीन दिवसांपासून अन्न, पाणी किंवा उबदार कपडे मिळालेले नाहीत. त्यांनी जूलियाना मरीन्स जरी हरवलेली असली तरी वोल्केनो पार्क सुरू ठेवण्याची प्रशासनाची भूमिका टीकेस पात्र ठरवली आहे. ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की ते इंडोनेशियन अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहे.
advertisement
जूलियाना मरीन्स कोण आहे?
26 वर्षीय जूलियाना मरीन्स शनिवारी माउंट रिंजानीवर एका छोट्या ग्रुपसोबत चढाई करत होती. त्यावेळी ती माउंट रिंजानीच्या क्रेटर लेकवर असलेल्या मार्गावरून 1600 फूट खोल दरीत पडली. रिओ डी जानेरियोच्या जवळची ही इन्फ्लुएंसर मरीन्स इंस्टाग्रामवर तिच्या दक्षिण-पूर्व आशियातील बॅकपॅकिंग प्रवासाबद्दल पोस्ट करत होती. यात तिने व्हिएतनाम, थायलंड, फिलीपिन्स आणि इंडोनेशिया येथील फोटो शेअर केले होते.
बचाव मोहिमेसाठी 3 हेलिकॉप्टर तैनात
इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी जूलियाना मरीन्सला वाचवण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. शोध मोहिम आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे, अशी माहिती वेस्ट नुसा तेंगारा राज्याचे गव्हर्नर लालू मुहम्मद इकबाल यांनी दिली. इकबाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इंडोनेशियन सशस्त्र दल आणि राष्ट्रीय शोध आणि बचाव एजन्सीकडून एक हेलिकॉप्टर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 च्या सुमारास पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यांनी सांगितले की, महिला पर्यटकाची लवकरात लवकर आणि सुरक्षित सुटका करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.
