TRENDING:

China News: चीनला रंगेहाथ पकडले, गुप्त फोटोंसह सुरू होता डर्टी गेम; भारतासह अनेक देश अलर्ट मोडवर

Last Updated:

China Spy: चीनने राफेल लढाऊ विमानांबाबत गुप्त हेरगिरी मोहिम सुरू केली असून, ग्रीसमधील तानाग्रा एअरबेसवर फोटो काढताना चार चिनी नागरिक अटकेत आले आहेत. फ्रान्स आणि भारताने चीनच्या खोट्या प्रचार मोहिमेचा पर्दाफाश केला आहे. चीन आपली J-10C विमाने विकण्यासाठी राफेलला बदनाम करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अथेन्स: हेरगिरीसाठी कुख्यात असलेल्या चीनने केवळ सायबर स्पेसपुरतेच नव्हे, तर प्रत्यक्ष फील्ड एजंटही सक्रिय केले आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांचं लक्ष सर्वाधिक राफेल लढाऊ विमानावर आहे. असाच एक प्रकार ग्रीसमध्ये समोर आला आहे. ग्रीसच्या मीडियानुसार, तानाग्रामध्ये चार चिनी नागरिकांना हेरगिरीच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून संवेदनशील संस्थांच्या आणि राफेल फायटर विमानांच्या छायाचित्रांची मोठी संख्या जप्त करण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या रिपोर्टनुसार, दोन पुरुष, एक महिला आणि एक युवक हे सर्वात आधी हेलेनिक एअरोस्पेस इंडस्ट्री (HAI) च्या सुरक्षा रक्षकाच्या नजरेस आले. त्यांना तेथून निघण्यास सांगण्यात आलं, पण इशाऱ्यानंतरही त्यांनी जागा सोडली नाही. उलट ते HAI इंस्टॉलेशन आणि 114व्या कॉम्बॅट विंगच्या सतत छायाचित्रे घेत राहिले. याच एअरबेसवर ग्रीस एअरफोर्सच्या राफेल विमानांचे स्क्वॉड्रन तैनात आहे. ही माहिती 114 व्या कॉम्बॅट विंगच्या एअरफोर्स पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ त्या चौघांचा मागोवा घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

advertisement

रिपोर्टनुसार प्राथमिक तपासात त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात फोटोग्राफिक मटेरियल जप्त करण्यात आले. त्यात राफेल फायटर विमानांचीही छायाचित्रे समाविष्ट होती.

भारत आणि फ्रान्सने पकडली चीनची चोरी

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हातून पराभूत झालेल्या पाकिस्तानला देखील याचा धक्का बसलेला आहे. चीन तर त्याहून दोन पावलं पुढे जाऊन आपली शस्त्रास्त्रांची बाजारपेठही सजवत आहे. पाकिस्तान अजूनही राफेल पाडल्याच्या बनावट बातम्या पसरवत आहे. भारत सरकारच्या PIB कडून या सर्व प्रोपगंडाचं फॅक्ट चेक केलं जात आहे. फ्रान्सने देखील चीनची चोरी पकडली आहे.

advertisement

फ्रान्सच्या गुप्तचर संस्थेच्या रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की, चीन आपल्या दूतावासांमार्फत आणि मिलिटरी अटॅशेंच्या मदतीने अशा देशांमध्ये अधिक सक्रिय झाला आहे. जे राफेलची खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहेत. यात इंडोनेशिया, ब्राझील आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे. चीन यासाठी सोशल मिडिया आणि प्रसारमाध्यमांमधून एआय जनरेटेड व्हिडिओज, वॉर-गेम फुटेज आणि जुन्या अपघातांचे क्लिप्स पसरवत आहे. जेणेकरून राफेल विमाने अयशस्वी असल्याचा प्रचार केला जाऊ शकतो.

advertisement

चीनने उभा केला बाजार

पाकिस्तानने चीनकडून २० J-10C लढाऊ विमाने विकत घेतली आहेत. आता चीन इंडोनेशियाला आकर्षक ऑफर देऊन दुसरा ग्राहक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच चीनने आपल्या J-10C ची विक्री वाढवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचा आधार घेतला. भारताकडून जोरदार मार खाल्ल्यानंतर चीन आपल्या संरक्षण उपकरणांना वॉर टेस्टेड म्हणून जाहिरात करत आहे.

advertisement

एका रिपोर्टनुसार- इंडोनेशिया सरकार सध्या J-10 फायटर जेट खरेदी करण्याची व्यवहार्यता तपासत आहे. रिपोर्टनुसार बांगलादेशही आता १६ J-10C खरेदी करण्याचा विचार करत आहे. यापूर्वी त्यांनी राफेल खरेदीचा विचार केला होता. चीन आणि पाकिस्तानने एकत्रितपणे तयार केलेल्या JF-17 लढाऊ विमानांकरिता एक नवीन ग्राहक मिळाल्याचंही सांगितलं जात आहे. पाकिस्तान सरकारचा दावा आहे की, अझरबैजानने ४० JF-17 ची डील केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानच चीनने आपल्या सर्व मीडियामार्फत – CCTV न्यूज, बीजिंग न्यूज, सिना मिलिटरी, रेफरन्स न्यूज आणि दोन डझनांहून अधिक Weibo हँडल्सवर J-10C आणि PL15 हवेतील मिसाईलचे खूपच स्तुतिसुमने गायले होते. चीनने आपल्या मिसाईल्सच्या विजयी कामगिरीचा प्रचार करत PL15 या क्षेपणास्त्राला अमेरिकेच्या AMRAAM AIM-120 आणि फ्रान्सच्या Meteor मिसाईलपेक्षा अधिक चांगले असल्याचेही भासवले.

मराठी बातम्या/विदेश/
China News: चीनला रंगेहाथ पकडले, गुप्त फोटोंसह सुरू होता डर्टी गेम; भारतासह अनेक देश अलर्ट मोडवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल