TRENDING:

चीन भयानक बदला घेणार, टाकला मोठा डाव; नोव्हेंबर 8 पासून जगाचा Supply बंद, अमेरिकेसह युरोपातील बाजारात खळबळ

Last Updated:

China News: चीनच्या स्फोटक घोषणेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. नोव्हेंबरपासून कार, चिप्स, टॅंक आणि फायटर जेट्ससारख्या उपकरणांचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट ओढवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले “टॅरिफ युद्ध” आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे त्याचा परिणाम फक्त अमेरिकेपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण जगाला त्याची झळ बसणार आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता आणि त्यावरून आता “ड्रॅगन” अर्थात चीन संतापला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने असा निर्णय घेतला आहे, ज्याचा परिणाम अमेरिका, युरोपसह जगभरातील अनेक देशांवर होणार आहे.

advertisement

बीजिंगने जाहीर केले आहे की, ते लवकरच जगभरात अनेक महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा थांबवणार आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरपासून कार, संगणक, चिप, तसेच टॅंक आणि फायटर जेटपर्यंत अनेक उपकरणांची पुरवठा साखळी (Supply Chain) बंद केली जाईल. याचा सर्वाधिक फटका अमेरिका आणि युरोपला बसणार आहे. चीनच्या नव्या घोषणेनुसार 8 नोव्हेंबरपासून या निर्यात निर्बंधांचा पहिला टप्पा लागू होईल. तर दुसरा टप्पा 1 डिसेंबरपासून सुरू होईल.

advertisement

हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे. जेव्हा जगभरातील उत्पादन क्षेत्र आधीच कच्च्या मालाच्या तुटवड्याने त्रस्त आहे. याआधी गेल्या शुक्रवारी ट्रम्प यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती आणि त्याच्या प्रत्युत्तरात चीनने हा पलटवार केला आहे.

रेअर अर्थनंतर चीनचा नवा डाव

advertisement

याआधी चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यात चीनने ‘रेअर अर्थ’ आणि त्यापासून तयार होणाऱ्या मॅग्नेटच्या निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्णयामुळे जगभरातील ई-वाहने, संगणक चिप्स आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आणि त्याचा फटका भारतासह अनेक देशांच्या उत्पादन क्षेत्रांना बसला. आता पुन्हा एकदा चीनने जगाला लक्ष्य करत नव्या निर्यात निर्बंधांची घोषणा केली आहे.

advertisement

कोणत्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी?

या वेळी चीनने लष्करी उपकरणे आणि घटक (military components) यांच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. यात मिसाइल आणि फायटर जेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर्स, टँकमध्ये रेंज मोजण्यासाठी लागणारी साधने, लक्ष्य भेदणारी शस्त्रे आणि अनेक प्रकारची लष्करी उपकरणे यांचा समावेश आहे.

या पावलाचा सर्वाधिक परिणाम युक्रेन आणि युरोपमधील देशांवर होणार आहे. सध्या हे देश रशियाच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर आपली संरक्षणशक्ती वाढवण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनात काम केलेले जे. ट्रूसडेल यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना म्हटले, आपण आर्थिक तणावाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.

युरोपसाठी वाढणार संकट

चीनचा हा ताजा निर्णय युरोपीय देशांसाठी संकटाची घंटा ठरू शकतो. सध्या युरोपातील देश रशियाविरुद्ध आपली लष्करी ताकद मजबूत करण्यावर भर देत आहेत. अशा वेळी चीनने लष्करी उपकरणांच्या पुरवठ्यावर बंदी घातल्यास, रशिया या देशांवर अधिक प्रभाव टाकू शकतो.

याशिवाय, चीन आधीच युरोपियन युनियनने त्यांच्या ई-वाहनांवर टॅरिफ लावल्याबद्दल नाराज आहे. आणि आता ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ घोषणेमुळे तो पूर्णपणे भडकला आहे. या घडामोडींचा परिणाम अमेरिकेवर तुलनेने कमी होईल; पण युरोपीय देशांवर त्याचा मोठा आर्थिक आणि संरक्षणात्मक परिणाम होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
चीन भयानक बदला घेणार, टाकला मोठा डाव; नोव्हेंबर 8 पासून जगाचा Supply बंद, अमेरिकेसह युरोपातील बाजारात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल