पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या जगात असे 36 देश आणि स्वायत्त प्रदेश आहेत, ज्यांच्याकडे स्वतःची कोणतीही अधिकृत सेना नाही. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. जिकडे महासत्ता रक्षण करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स शस्त्रास्त्रांवर खर्च करत आहेत, तिकडे या देशांमध्ये ना टँकचा गडगडाट ऐकू येतो, ना क्षेपणास्त्रांचा साठा तैनात असतो. मग हे देश सुरक्षित कसे राहतात? मिडिल ईस्टमध्ये वाढत्या तणावात या देशांचं 'सुरक्षा मॉडेल' नक्की काय आहे, हे समजून घेणं रंजक ठरेल.
advertisement
लष्कर नाही, मग रक्षण कोण करतं?
या 36 देशांच्या सुरक्षेचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे 'इंटरनेशनल डिफेंस पॅक्ट्स'. या देशांनी स्वतःची फौज उभारण्यापेक्षा जगातील महासत्तांसोबत हातमिळवणी केली आहे.
1. शक्तिशाली शेजाऱ्यांची साथ
या यादीतील अनेक देशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या शेजारील बलाढ्य राष्ट्रांवर आहे.
वॅटिकन सिटीची सुरक्षा इटली करतो.
भूतानच्या संरक्षणासाठी भारत सदैव ढाल बनून उभा असतो.
मॉरिशसच्या सुरक्षेचा मुख्य भागीदार भारत आहे.
मोनाकोची जबाबदारी फ्रान्सने घेतली आहे.
2. 'महासत्ता' बनल्या आहेत रक्षक
ग्रीनलँड आणि जिब्राल्टरसारख्या भागांना सैन्यावर एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. कारण ग्रीनलँडची सुरक्षा डेन्मार्कच्या जिम्म्यावर आहे, तर जिब्राल्टर किंवा बर्मुडाची सुरक्षा युनायटेड किंगडम (UK) सांभाळते. आइसलँडकडे स्वतःची फौज नाही, पण तो 'नाटो'चा (NATO) सदस्य आहे. याचा अर्थ, आइसलँडवर झालेला हल्ला हा अमेरिकेसह ३० पेक्षा जास्त देशांवर झालेला हल्ला मानला जातो.
इराण-इस्रायल युद्धाचा या निशस्त्र देशांवर परिणाम होईल का?
इराण आणि इस्रायलमधील थेट युद्धामुळे जागतिक सुरक्षेची समीकरणे बदलली आहेत. जरी या देशांकडे सैन्य नसलं, तरी ते जागतिक अर्थव्यवस्थेपासून वेगळे नाहीत. जर अमेरिका थेट युद्धात उतरली, तर मार्शल आयलँड्स किंवा पलाऊसारख्या देशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं, कारण त्यांच्या सुरक्षेची गॅरंटी अमेरिकेने घेतली आहे. शिवाय, युद्धामुळे वाढणारी महागाई आणि कच्च्या तेलाची टंचाई या शांतताप्रिय देशांच्या बजेटचं गणित बिघडवू शकते. आजच्या युगात कोणताही प्रदेश युद्धाच्या परिणामांपासून पूर्णपणे अलिप्त राहू शकत नाही.
विनालष्कर असलेल्या 36 देशांची आणि क्षेत्रांची यादी:
मॉरिशस आणि भूतान पण या देशांना भारत लष्करासाठी मदत करतो.
पलाऊ (2044 पर्यंत जबाबदारी), मायक्रोनेशिया, मार्शल आयलँड्स, प्वेर्तो रिको या देशांना अमेरिके रक्षण करतो.
समोआ, नियू, कूक आयलँड्स या देशांना न्यूझीलंडची साथ आहे.
वानुआतु, सोलोमन आयलँड्स, नौरू, किरिबाती या देशांना ऑस्ट्रेलियारक्षा देतं.
युरोपातील सुरक्षित देश: वॅटिकन सिटी, सॅन मरिनो (इटलीद्वारे), मोनॅको, अंडोरा (फ्रान्स आणि स्पेनद्वारे), लिक्टनस्टीन (स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाची मदत).
चीनची जबाबदारी: हाँगकाँग आणि मकाऊ.
UK हा देश केमन आयलँड्स, फॉकलँड आयलँड्स, बर्मुडाला सुरक्षा देतो.
लष्कर बरखास्त केलेले देश: कोस्टा रिका (1948 मध्ये सेना संपवली), पनामा (1990 मध्ये सेना बरखास्त).
स्वतःची सेना नसणे हा या देशांसाठी एक प्रकारे आर्थिक फायदाच ठरला आहे, कारण ते आपला सर्व पैसा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करू शकतात. मात्र, जागतिक युद्धाचे ढग गडद होत असताना, या देशांची सुरक्षा पूर्णपणे त्यांच्या 'रक्षक' देशांच्या क्षमतेवर अवलंबून आहे.
