फेब्रुवारी 2025 पर्यंत शास्त्रज्ञांचा अंदाज होता की या क्षुद्रग्रहाच्या चंद्रावर आदळण्याची शक्यता 3.8 टक्के आहे. पण मे 2025 मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) कडून मिळालेल्या नव्या डेटानुसार ही शक्यता आता 4.3 टक्क्यांवर गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ अँडी रिवकिन यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास चालू आहे. त्यांच्यानुसार या टक्करमुळे चंद्राला फारसा धोका पोहोचणार नाही. त्याची कक्षा बदलणार नाही, तो फुटणारही नाही. मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर एक मोठा खड्डा जरूर बनेल, जो शास्त्रज्ञांसाठी अत्यंत रोमांचक ठरेल.
advertisement
या प्रभावामुळे आपल्याला अवकाशातील वस्तूंची गती, ऊर्जा आणि टक्कर झाल्यानंतर काय घडतं याबद्दल मौल्यवान माहिती मिळू शकते. सध्या हा अंतिम अंदाज नाही, कारण ‘2024 YR4’ सध्या खूप दूर आहे आणि त्याला पाहणं कठीण आहे. पण 2028 मध्ये जेव्हा हा पुन्हा पृथ्वीजवळ येईल, तेव्हा खगोलशास्त्रज्ञ त्याची कक्षा आणि टक्कर होण्याची शक्यता अधिक अचूकपणे तपासू शकतील.
जर ही टक्कर झाली, तर हे दृश्य शास्त्रज्ञांसाठीच नव्हे तर सामान्य लोकांसाठीही आकाशातील एक अद्वितीय शो ठरू शकतो. यात फक्त स्फोटच नाही, तर ज्ञानाही मिळाले.
