TRENDING:

Secret News: सर्व काही गुपचुप सुरू आहे, फक्त 625 लोक वाचतील; तुमचे काय होणार, कुठे जाणार?

Last Updated:

जग उद्या संपणार असेल, तर अब्जाधीश कुठे असतील? अमेरिकेच्या एका माजी अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे खळबळ माजली आहे, ज्यानुसार श्रीमंतांनी जगातील आपत्त्यांपासून वाचण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून गुप्त बंकर्स तयार केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: जर उद्या जग संपणार असेल तर अब्जाधीश आपल्या गुप्त बंकर्समध्ये बसून चहा पीत असतील का? अमेरिकेच्या एका माजी अधिकाऱ्याच्या सनसनाटी दाव्यामुळे आज लाखो लोकांच्या मनात हाच प्रश्न घोळत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या प्रशासनात काम केलेल्या कॅथरीन ऑस्टिन फिट्स यांनी नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की अमेरिकन सरकारने 1998 ते 2015 दरम्यान गुपचूपपणे 21 ट्रिलियन (सुमारे 1,74,30,00,00,00,000 रुपये) खर्च करून जवळपास 170 भूमिगत आणि समुद्राखालील बंकर्स (Bunkers) तयार केले आहेत. हे सर्व बंकर्स एखाद्या अज्ञात ऊर्जा तंत्रज्ञानाशी संबंधित गुप्त वाहतूक प्रणालीने एकमेकांशी जोडलेले आहेत.
News18
News18
advertisement

फॉक्स न्यूजचे प्रसिद्ध निवेदक टकर कार्लसन यांच्या पॉडकास्टमध्ये फिट्स यांनी हा धक्कादायक दावा केला. जगातील मोठ्या आपत्त्यांपासून श्रीमंत लोकांना वाचवण्यासाठी हे बंकर्स बांधले गेले आहेत, असे फिट्स यांचे म्हणणे आहे. मात्र या दाव्याचे ठोस पुरावे अजूनही समोर आलेले नाहीत. पण यामुळे सामान्य जनतेची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे की, आखिर प्रलयकाळासाठी कोणी काय तयारी केली आहे?

advertisement

21 ट्रिलियन...हे पैसे कुठे गेले?

फिट्स यांच्या मते, त्यांची ही माहिती अर्थशास्त्रज्ञ मार्क स्किडमोर यांच्या 2017 च्या अहवालावर आधारित आहे. या अहवालात अमेरिकेच्या संघीय खर्चात मोठ्या अनियमितता आढळल्या होत्या. संरक्षण (Defense) आणि गृहनिर्माण (Housing) विभागांमध्ये लाखो-करोडो डॉलर्सचे असे Unsupported Adjustments नोंदवले गेले होते. ज्याचा कोणताही हिशेब मिळाला नाही. फिट्स यांचा दावा आहे की, हेच पैसे गुप्तपणे मोठ्या संख्येने बंकर्स बांधण्यासाठी खर्च झाले आहेत.

advertisement

advertisement

ही केवळ 'थिअरी' नाही, बंकर्स तर बनत आहेत!

अमेरिकेतील Strategically Armored and Fortified Environments या कंपनीने नुकताच 'एअरी' (Aerie) नावाचा एक प्रकल्प जाहीर केला आहे. वॉशिंग्टनजवळ 2026 पर्यंत पूर्ण होणारा हा सुमारे 2,500 कोटी किमतीचा भूमिगत किल्ला जगातील सर्वात श्रीमंत 625 लोकांना आपत्त्यांच्या वेळी सुरक्षित ठेवेल. या बंकरमध्ये प्रवेशाचे शुल्क प्रत्येक व्यक्तीसाठी सुमारे 160 कोटी आहे.

advertisement

हा बंकर कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नसेल. यात एआय-चलित वैद्यकीय सेवा (AI-driven Medical Care), वेलनेस प्रोग्राम्स, बॉलिंग ॲली, इनडोअर स्विमिंग पूल आणि आयव्ही थेरपी रूम्स देखील असतील. जगभरातील हजारो श्रीमंत लोकांनी या बंकरमध्ये राहण्यासाठी बुकिंगसाठी अर्ज केले आहेत.

आपण काय करणार?

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, 2018 मध्येच कमीत कमी सात टेक अब्जाधीशांनी न्यूझीलंडमध्ये बंकर्स विकत घेतले होते. मार्क झुकरबर्ग हवाई बेटावर एक विशाल खाजगी संकुल बांधत आहेत.ज्यात भूमिगत बंकरचा समावेश आहे. माहितीनुसार बांधकाम करणाऱ्या मजुरांना गोपनीयता करारावर (NDA - Non-Disclosure Agreement) स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. डग्लस रशकॉफ (Douglas Rushkoff) सारख्या मीडिया विचारवंतांचे मत आहे की, ही प्रवृत्ती एक मोठी चिंता दर्शवते, की श्रीमंत वर्गाला स्वतःलाही विश्वास नाही की हे जग जास्त दिवस असेच टिकेल.

मराठी बातम्या/विदेश/
Secret News: सर्व काही गुपचुप सुरू आहे, फक्त 625 लोक वाचतील; तुमचे काय होणार, कुठे जाणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल