TRENDING:

नासाला अंतराळातून आला Final Laser Signal, पृथ्वी थक्क; सिग्नलचा अर्थ काय?

Last Updated:

Final Laser Signal: नासाच्या Psyche स्पेसक्राफ्टनं तब्बल 218 दशलक्ष मैलांवरून पृथ्वीवर शेवटचा लेझर सिग्नल पाठवला. हा ऐतिहासिक क्षण गाठताच नासामध्ये आनंद आणि जल्लोषाची लाट उसळली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

वॉशिंग्टन : पृथ्वीने नासाच्या Psyche या स्पेसक्राफ्टकडून आलेला शेवटचा लेझर मेसेज रिसीव्ह केला आहे. तब्बल 350 दशलक्ष किलोमीटर (218 दशलक्ष मैल) दूरवरून आलेला हा सिग्नल स्पेस कम्युनिकेशन तंत्रज्ञानात ऐतिहासिक ठरला आहे. आता Psyche आपल्या मुख्य मिशनकडे म्हणजेच ऍस्टरॉइड बेल्टकडे रवाना होत आहे. यापूर्वी Psyche ने डिसेंबर 2024 मध्ये 494 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून इन्फ्रारेड लेझर बीम पाठवून जगाला आश्चर्यचकित केले होते.

advertisement

नासाचा DSOC (Deep Space Optical Communications) टेस्ट आतापर्यंत 13.6 टेराबाइट डेटा पाठवून सिद्ध करून दाखवला आहे की भविष्यात रेडिओ नव्हे तर लेझर हीच स्पेस कम्युनिकेशनची खरी दिशा असणार आहे.

advertisement

307 दशलक्ष मैलांवरून आलेला पहिला ऐतिहासिक मेसेज

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Psyche ने 307 दशलक्ष मैल (494 दशलक्ष किलोमीटर) अंतरावरून लेझर सिग्नल पाठवला होता. हे अंतर पृथ्वीमंगळाच्या सरासरी अंतरापेक्षा दुप्पट आणि पृथ्वीचंद्राच्या अंतरापेक्षा तब्बल 1285 पट जास्त होती. DSOC साठी ही एक मोठी ऐतिहासिक कामगिरी होती.

advertisement

Psyche चा शेवटचा लेझर डाउनलिंक 

आता Psyche ने आपला 65वा आणि अंतिम लेझर डाउनलिंक पृथ्वीवर पाठवला आहे. हा सिग्नल 350 दशलक्ष किलोमीटर (218 दशलक्ष मैल) दूरवरून आला. यानंतर हा स्पेसक्राफ्ट फक्त स्टॅण्डर्ड रेडिओ कम्युनिकेशनवर काम करेल आणि आपलं पूर्ण लक्ष ऍस्टरॉइड मिशनकडे वळवेल. Psyche चे उद्दिष्ट आहे की तो 2029 पर्यंत आपल्या नावावर असलेल्या विशाल ऍस्टरॉइडपर्यंत पोहोचावा.

advertisement

स्पेसहून ब्रॉडबॅण्डसारखी स्पीड

DSOC ने आतापर्यंत 13.6 टेराबाइट डेटा ट्रान्सफर केला आहे. यातील सर्वात मोठे यश म्हणजे 30.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून 267 Mbps वेगाने अल्ट्रा-एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंग करण्यात यश मिळालं. हा वेग पृथ्वीवरील घरी मिळणाऱ्या ब्रॉडबॅण्डसारखाच होता. मात्र अंतर वाढत गेलं तसतसा डाउनलिंक रेट कमी झाला आणि एप्रिल 2024 मध्ये तो 25 Mbps वर आला.

लेझर कम्युनिकेशन का आवश्यक आहे?

रेडिओ सिग्नल विश्वासार्ह असले तरी ते मंद आणि मर्यादित आहेत. नासाच्या डीप स्पेस नेटवर्क ने आधीच आपली क्षमता मर्यादित असल्याचे दाखवून दिलं आहे. लेझर बीम मात्र जास्त प्रमाणात डेटा वेगाने पाठवू शकतात, पण त्यांचं लक्ष्य अत्यंत अचूक असावं लागतं. कारण किंचित गडबड झाली तरी सिग्नल हरवतो.

स्पेसमध्ये जाताना प्रकाशकण (फोटॉन्स) कमकुवत होत जातात. त्यामुळे दूरवरून येणारे फोटॉन्स पकडण्यासाठी अत्यंत संवेदनशील रिसीव्हर्स लागतात. त्यातही पृथ्वीचं वातावरण आणि हवामान सिग्नलमध्ये व्यत्यय आणतात. म्हणून भविष्यात स्पेस रिले सॅटेलाइट्सची मदत घ्यावी लागू शकते.

नासाचा संदेश

नासाचे अॅक्टिंगडमिनिस्ट्रेटर सीन डफी यांनी सांगितले की- लेझर कम्युनिकेशनमुळे आपण मंगळावरून हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि मौल्यवान डेटा ट्रान्सफरच्या अधिक जवळ आलो आहोत.

मराठी बातम्या/विदेश/
नासाला अंतराळातून आला Final Laser Signal, पृथ्वी थक्क; सिग्नलचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल