TRENDING:

खतरनाक प्लॅनिंग, सिक्रेट मिटींग अन् एका क्षणात 30 बॉम्ब, इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईंना कसं मारलं?

Last Updated:

How irani Supereme Leader Ayatollah Ali Khamenei Killed: शनिवारी सकाळी इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
How irani Supereme Leader Ayatollah Ali Khamenei Killed: शनिवारी सकाळी इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे. हा हल्ला होताच अमेरिकेनं देखील युद्धात उडी घेतली असून त्यांनी इस्त्रायलच्या बाजुने इराणविरोधात युद्ध पुकारलं आहे. या युद्धात कालपासून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा देखील समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

अमेरिका-इस्त्रायलने खामेनेईंना कसं मारलं?

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी (२८ फेब्रुवारी) इराणवर मोठा हल्ला केला. या मोहिमेला इस्रायलने 'रोअरिंग लायन' (Roaring Lion) आणि अमेरिकेने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) असं नाव दिलं होतं. हा हल्ला थेट तेहरानमधील खामेनेई यांच्या निवासस्थानासह एकूण ३० ठिकाणी करण्यात आला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी खामेनेई हे त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसोबत हेड क्वार्टरमध्ये बैठक घेत होते. त्याच वेळी हा स्ट्राइक करण्यात आला.

advertisement

डझनभर इस्रायली फायटर जेट्सनी इराणमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बफेक केली. यामध्ये खामेनेई यांच्या घरासोबतच इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्यात आलं. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली लढाऊ विमानांनी खामेनेई यांच्या घरावर एकाच वेळी तब्बल ३० बॉम्ब टाकले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खामेनेई यांची मुलगी, जावई, नातू आणि सून यांचा समावेश आहे.

advertisement

खामेनेईंना मारण्यासाठी कोणता बॉम्ब वापरला?

खामेनेई यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी कोणता बॉम्ब वापरला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र प्राथमिक रिपोर्टनुसार, इस्रायलने त्यांच्या अत्यंत प्रगत अशा बंकर-बस्टर (Bunker-buster) बॉम्बचा वापर केला असावा, असा अंदाज आहे. कारण खामेनेई यांचं निवासस्थान अत्यंत सुरक्षित आणि मजबूत मानलं जात होतं. मात्र हा हल्ला इतका भीषण होता की खामेनेई यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला, असं वृत्त काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिलं आहे.

advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ' सोशल मीडिया अकाउंटवर आणि व्हिडिओ संदेशाद्वारे या घटनेची पुष्टी केली. इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आह. शिवाय खामेनेई हे इतिहासातील सर्वात दुष्ट व्यक्तींपैकी एक असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला. खामेनेई यांना ठार करून अमेरिकेनं इराणी लोकांना न्याय दिल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. खामेनेई हे अमेरिकेच्या "इंटेलिजन्स आणि हायली सोफिस्टिकेटेड ट्रॅकिंग सिस्टम" पासून वाचू शकले नाहीत, असंही ते म्हणाले.

advertisement

खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी इराणी मीडियाने देखील केली आहे. आता इराणने खामेनेई यांच्या निधनानंतर ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. तसेच पुढील सात शासकीय सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. तसेच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी (IRGC) या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली असून त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत.

इराणी नेत्यांना वेचून मारलं

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणवर हल्ला करण्याची वेळ निश्चित केली होती, त्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांची बैठक होणार होती. हल्ले सुरू व्हायच्या काही काळ आधी खामेनेई हे शामखानी आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांना एका सुरक्षित ठिकाणी भेटले.

AI Generated Photo

यानंतर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सचिव अली शामखानी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कमांडर मोहम्मद पाकपौर यांच्यासह वरिष्ठ लेफ्टनंट मारले गेले.

इराणने दुबई एअरपोर्ट, बुर्ज खलिफा, अबूधाबी, बहरीन सगळीकडे सोडल्या मिसाईल, धडकी भरवणारे VIDEO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण जवळपास एक तासभर स्तब्ध राहिला. लगेच प्रत्युत्तर दिलं नाही. मात्र तासाभरात इराणच्या सैन्याने सात पश्चिम आशियाई देशांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिलं. इराणने सात देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हे हल्ले केले. हल्ल्याचे व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

मराठी बातम्या/विदेश/
खतरनाक प्लॅनिंग, सिक्रेट मिटींग अन् एका क्षणात 30 बॉम्ब, इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईंना कसं मारलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल