advertisement

इराणने दुबई एअरपोर्ट, बुर्ज खलिफा, अबूधाबी, बहरीन सगळीकडे सोडल्या मिसाईल, धडकी भरवणारे VIDEO

Last Updated:

Iran Under Attack: शनिवारी सकाळी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. इस्त्रायलनंतर अमेरिकेनं देखील इराणवर हल्ला केला असून नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे.

News18
News18
Iran Under Attack: शनिवारी सकाळी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. इस्त्रायलनंतर अमेरिकेनं देखील इराणवर हल्ला केला असून नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे. दोन्ही देशांनी एकाच वेळी हल्ला केल्यानंतर इराण देखील चवथाळलं आहे. अमेरिका-इस्त्रायलचं सैनिकी स्थळ असलेल्या तब्बल सात देशांवर इराणने हल्ला चढवला आहे.
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण जवळपास एक तासभर स्तब्ध राहिला. लगेच प्रत्युत्तर दिलं नाही. मात्र तासाभरात इराणच्या सैन्याने सात पश्चिम आशियाई देशांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिलं. इराणने सात देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हे हल्ले केले. इराणने एकाच वेळी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत, कतार, जॉर्डन आणि इराकवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
advertisement
advertisement

इराणने कुठल्या देशात कशावर हल्ला केला?

इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या फ्लीट मुख्यालयावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. मनामामध्ये धूर आणि स्फोट दिसून आले.
युएई: अबू धाबी आणि अल धफ्रा तळांवर हल्ले.
कतार: अल उदेद हवाई तळावर लक्ष्य.
कुवेत: अली अल सलेम तळावर क्षेपणास्त्र हल्ला.
जॉर्डन: दोन क्षेपणास्त्रे रोखण्यात आली.
सौदी अरेबिया: रियाधमध्ये स्फोटांची नोंद झाली.
advertisement
advertisement
इराणने डझनभर बॅलिस्टिक, सुपरसॉनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये इस्रायल, अबू धाबी आणि दुबई, सौदी अरेबियाची राजधानी रियाध, दोहा, बहरीनची राजधानी मनामा आणि कुवेत, जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याचा युएईवर व्यापक परिणाम झाला. दुबईमध्ये दिवसभर सतत स्फोट होत राहिले. जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीजवळ देखील स्फोट पाहायला मिळाले आहेत. तसेच युएईने अनेक क्षेपणास्त्रे रोखल्याचा दावा केला. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्येही सतत स्फोट होत होते.
advertisement
advertisement
बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या फिफ्थ फ्लीटला सर्वाधिक फटका बसला. हल्ल्यानंतर तेथे मोठी आग लागली. कतारमध्येही स्फोट झाले, इराणच्या आयआरजीसीने याला "शक्तिशाली हल्ला" म्हटलं आहे.
मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान, भारताने इस्रायल आणि इराणमधील आपल्या नागरिकांना "अत्यंत सावधगिरी" बाळगण्याचा आणि नियुक्त केलेल्या आश्रयस्थानांजवळ राहण्याचा सल्ला दिला आहे. अंदाजे ९.७ दशलक्ष भारतीय नागरिक मध्य पूर्वेत राहतात आणि काम करतात.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणने दुबई एअरपोर्ट, बुर्ज खलिफा, अबूधाबी, बहरीन सगळीकडे सोडल्या मिसाईल, धडकी भरवणारे VIDEO
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement