व्हिएन्ना : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) च्या ताज्या अहवालाने सीरियाबाबत नवीन खळबळ उडवली आहे. एजन्सीला तिथे युरेनियमचे काही कण सापडले आहेत. जे कथित गुप्त अणु कार्यक्रमाशी संबंधित असू शकतात. हा तोच कार्यक्रम आहे ज्यावर 2007 मध्ये इस्रायलने बॉम्बहल्ला करून तोडफोड केली होती.
advertisement
माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या काळात सीरियावर आरोप होता की त्यांनी पूर्वीच्या देइर अल-जोर प्रांतात उत्तर कोरियाच्या मदतीने एक गुप्त अणुभट्टी (न्यूक्लिअर रिअॅक्टर) उभारली होती. सप्टेंबर 2007 मध्ये इस्रायलने हवाई हल्ला करून हे ठिकाण उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर हा परिसर गूढतेत झाकला गेला. आता IAEA ने तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पर्यावरणीय नमुने घेतले. ज्यातील एका ठिकाणी प्रोसेस्ड युरेनियम कण सापडले.
सीरियाचा गुप्त अणु कार्यक्रम उघडकीस?
अहवालात म्हटले आहे की हे नैसर्गिक युरेनियम आहे. पण त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की- सीरियात फक्त सामान्य सैनिकी हालचाल नव्हती. तर खरा अणु कार्यक्रम राबवला गेला होता. मात्र हा युरेनियम समृद्ध (enriched) स्वरूपातील नव्हता.
सीरियाच्या नव्या सरकारचे अध्यक्ष अहमद अल-शरा यांनी IAEA प्रमुख राफेल ग्रोसी यांची भेट घेतली आणि सहकार्याचे आश्वासन दिले. ग्रोसी यांनी सांगितले की- सीरिया आता जुन्या अणु संबंधी प्रश्नांना पूर्ण पारदर्शकतेने उत्तर देण्यास तयार आहे. जूनमध्ये एजन्सीला पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला. जिथून नवीन नमुने घेण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत देइर अल-जोर येथे पुन्हा चौकशी केली जाणार आहे.
IAEA च्या मते काही युरेनियम कण असे आहेत जे युरेनियम ऑक्साईड मध्ये बदलण्याच्या प्रक्रियेशी जुळतात. हीच प्रक्रिया अणुभट्ट्यांमध्ये केली जाते. त्यामुळे हे नमुने सीरियाच्या गुप्त अणु कार्यक्रमाचा भाग असू शकतात, असे एजन्सीचे मत आहे.
मध्यपूर्वेत नवे पॉवर गेम
जर सीरियाने खरोखर अण्वस्त्रांच्या दिशेने पावले टाकली असतील, तर त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील शक्ती-संतुलन बदलू शकते. सध्या इस्रायलला या भागातील एकमेव अणु क्षमता असलेला देश मानले जाते. जरी त्याने कधीही अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. IAEA सीरियाला भविष्यात सुरक्षित अणुऊर्जा विकसित करण्यात आणि आरोग्यसेवांमध्ये अणु-तंत्रज्ञान (उदा. कर्करोग उपचार, रेडियोथेरपी) पुनर्संचयित करण्यात मदत करेल, असे ग्रोसी यांनी सांगितले.