TRENDING:

1 सेकंदाचा सिग्नल पकडला, वैज्ञानिकही गोंधळले; मानव इतिहासातील सर्वात थरारक शोध, मोठे गूढ उकलणार

Last Updated:

Scientist found Alternate Universe: 2019 मध्ये पकडलेला गुरुत्वीय तरंग आजही गूढ आहे. हा आवाज कृष्णविवरांच्या टक्करमुळे की दुसऱ्या जगातून आलेल्या वॉर्महोलमुळे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

अनेकदा असं घडतं की काही गोष्टी आपल्याला दिसतात, पण त्यामागचं खरं कारण किंवा त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण विज्ञानालाच माहिती नसतं. अशाच एका घटनेला वैज्ञानिकांनी 2019 मध्ये अनुभवले. त्या वेळी त्यांनी अशी एक गुरुत्वीय तरंग (Gravitational Wave) पकडली जी आजही खगोलशास्त्रज्ञांसाठी गूढ बनून राहिली आहे.

advertisement

अमेरिकेतील लायगो (LIGO) आणि युरोपमधील व्हिर्गो (Virgo) या डिटेक्टर्सनी तेव्हा एक अत्यंत सूक्ष्म सिग्नल पकडला होता. हा सिग्नल एका-दशांश सेकंदापेक्षाही कमी वेळ टिकला. सुरुवातीला संशोधकांनी हा प्रकार दोन कृष्णविवरांच्या (Black Holes) टक्कर होण्यामुळे घडला असे मानले. या घटनेला GW190521 असे नाव दिले गेले. त्या काळी हीच स्पष्टीकरणे सर्वात योग्य वाटत होती.

advertisement

मात्र 6 वर्षांनंतर या घटनेवर नवीन अभ्यास समोर आला आहे. चीनमधील युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस येथील भौतिक वैज्ञानिक कि लाइ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने असा अंदाज वर्तवला आहे की ही घटना कदाचित आपल्या विश्वात (Universe) घडलेली नाही. उलट ही गुरुत्वीय तरंग कदाचित एखाद्या समानांतर ब्रह्मांडातून (Parallel Universe) किंवा दुसऱ्या जगातून आली असावी आणि ती आपल्याला वॉर्महोल (Wormhole) मार्गे पोहोचली असावी.

advertisement

वॉर्महोल म्हणजे काय?

वॉर्महोल ही ब्रह्मांडातील एक कल्पित संरचना (Hypothetical Structure) आहे. साध्या भाषेत सांगायचं तर, तो विश्वातील दोन दूरच्या बिंदूंना जोडणारा एक शॉर्टकट पूल आहे. हे बिंदू अंतराळातील असू शकतात किंवा काळातील (Time) देखील असू शकतात.

advertisement

1935 मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन आणि नाथन रोसेन यांनी या संकल्पनेची मांडणी केली होती. म्हणूनच वॉर्महोलला आइनस्टाईनरोसेन ब्रिज (Einstein–Rosen Bridge) असेही म्हटले जाते.

सायन्स-फिक्शन चित्रपटांमध्ये वॉर्महोलला नेहमी एका बोगद्याप्रमाणे दाखवले जाते. जो सेकंदांच्या आत एका आकाशगंगेहून (Galaxy) दुसऱ्या आकाशगंगेत घेऊन जाऊ शकतो. आत्तापर्यंत ही कल्पना फक्त सैद्धांतिक आणि काल्पनिक स्वरूपातच आहे. पण जर 2019 मधील ही घटना खरंच वॉर्महोलशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले, तर ते वॉर्महोलच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा पहिलाच पुरावा ठरेल.

वैज्ञानिकांची भूमिका

संशोधक मात्र अजूनही हे अंतिम सत्य मानायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की- कृष्णविवरांच्या टक्कर होण्याची थिअरी अजूनही सर्वात मजबूत मानली जाते. पण वॉर्महोलचा पर्यायही दुर्लक्ष करता येणार नाही. जर हा सिग्नल खरोखरच वॉर्महोलमधून आला असेल, तर तो आपल्या विश्वाबद्दलच्या समजुतींना पूर्णपणे बदलून टाकेल. हा शोध केवळ खगोलशास्त्रज्ञांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक ऐतिहासिक वळण ठरेल.

सध्या वैज्ञानिक या सिग्नलचा आणखी सखोल अभ्यास करत आहेत. यातून नेमकं हे समजेल की ती तरंग कृष्णविवरांच्या टक्करमुळे निर्माण झाली होती, की आपण खरंच समानांतर ब्रह्मांडातून आलेल्या एखाद्या रहस्यमय आवाजाशी सामना केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
1 सेकंदाचा सिग्नल पकडला, वैज्ञानिकही गोंधळले; मानव इतिहासातील सर्वात थरारक शोध, मोठे गूढ उकलणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल