मृतांमध्ये श्रीहरी सुकूश (22) हा मूळचा केरळचा असून, तो कॅनडामध्ये वैमानिक प्रशिक्षण घेत होता. त्याच्यासोबत 20 वर्षांची कॅनडाची नागरिक साव्हाना मे रॉयेस हिचाही जागीच मृत्यू झाला. दोघेही एकाच प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते. भारतीय वंशाच्या श्रीहरीने याआधीच खासगी पायलट परवाना (Private Pilot License) मिळवला होता आणि आता व्यावसायिक वैमानिक परवाना (Commercial Pilot License) घेण्यासाठी प्रशिक्षण घेत होता.
advertisement
कॅनडातील टोरांटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेवर शोक व्यक्त करताना म्हटलं, श्रीहरी सुकूश या तरुण भारतीय वैमानिकाच्या दुर्दैवी मृत्यूने आम्हाला अत्यंत दु:ख झालं आहे. त्याच्या कुटुंबीयांप्रती आम्ही आपल्या संवेदना व्यक्त करतो. वाणिज्य दूतावास मृत कुटुंबाशी, प्रशिक्षण संस्थेशी आणि स्थानिक पोलिसांशी संपर्कात असून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
हवेत एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न आणि...
हरव्स एअर प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडम पेनर यांनी सांगितलं की, दोघेही विद्यार्थी पायलट छोटे सेसना सिंगल इंजिन विमानांमध्ये टेक-ऑफ आणि लँडिंग सराव करत होते. दोघांनी जवळपास एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची विमाने एकमेकांवर आदळली. दोन्ही विमानांमध्ये रेडिओ होते. मात्र दोघांनाही दुसरं विमान लक्षात आलं नाही, अशी माहिती New York Post च्या अहवालात देण्यात आली आहे.
घटनास्थळीच मृत्यू; दोघेही एकटेच होते
रॉयल कॅनडियन माउंटेड पोलिस (RCMP) ने घटनेनंतर दोघांचाही मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. विमानांमध्ये अन्य कोणी प्रवासी नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था
हरव्स एअर पायलट ट्रेनिंग स्कूलची स्थापना 1970च्या दशकात पेनर यांच्या पालकांनी केली होती. सध्या ही संस्था दरवर्षी सुमारे 400 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. त्यामध्ये अनेक देशांतील विद्यार्थी व्यावसायिक आणि वैयक्तिक हेतूसाठी प्रशिक्षण घेतात.
