TRENDING:

इराण अमेरिकामध्ये सीजफायर, 15 दिवस हल्ला करणार नाही, कोणत्या अटी घातल्या?

Last Updated:

"आज रात्री एका सभ्यतेचा अंत होईल आणि ती पुन्हा कधीच उभी राहू शकणार नाही," अशा शब्दांत इराणला इशारा देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या बॅकफूटवर आल्याचं दिसत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: "आज रात्री एका सभ्यतेचा अंत होईल आणि ती पुन्हा कधीच उभी राहू शकणार नाही," अशा शब्दांत इराणला इशारा देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या बॅकफूटवर आल्याचं दिसत आहेत. इराणवर मोठा लष्करी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या ट्रम्प यांनी अखेर आपला निर्णय दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलला आहे. पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर आणि इराणने रचलेल्या एका अनपेक्षित चक्रव्यूहामुळे अमेरिकेला आपले पाऊल मागे घ्यावे लागले आहे.
इराण अमेरिकेमध्ये सीजफायर
इराण अमेरिकेमध्ये सीजफायर
advertisement

काय आहे इराणचा 'ह्यूमन शील्ड' डाव?

इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले होणार हे निश्चित असतानाच तेहरानने एक धक्कादायक चाल खेळली. इराणने आपल्या महत्त्वाच्या पॉवर प्लांट्स आणि अणुकेंद्रोच्या रक्षणासाठी हजारो तरुणांना तिथे तैनात केले. या तरुणांचा वापर 'ह्यूमन शील्ड' (मानवी ढाल) म्हणून करण्यात आला. यावर संताप व्यक्त करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "हे सरळ सरळ बेईमानीचे लक्षण आहे. निरपराध तरुणांचा ढाल म्हणून वापर करणं चुकीचं आहे." मात्र, इराणच्या या खेळीमुळे अमेरिका नैतिक कोंडीत सापडला.

advertisement

पाकिस्तानची मध्यस्थी आणि १० सूत्रीय प्रस्ताव

या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेला शांततेचे आवाहन केलं होतं. पाकिस्तानने अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना १० सूत्रीय शांतता प्रस्ताव पाठवला होता. सुरुवातीला यावर मौन बाळगणाऱ्या ट्रम्प यांनी अखेर हा प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारला आहे. या प्रस्तावांतर्गत पुढील दोन आठवडे युद्धविराम (Ceasefire) पाळला जाणार असून, यादरम्यान दीर्घकालीन शांततेसाठी चर्चा केली जाईल. याला इस्त्रायल देखील तयार झाला आहे.

advertisement

ट्रम्प यांची अट आणि पुढील रणनीती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

डोनाल्ड ट्रम्प यांनी हा युद्धविराम स्वीकारताना एक महत्त्वाची अट घातली आहे. इराणला 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) तात्काळ आणि पूर्णपणे सुरक्षित वाहतुकीसाठी खुली करावी लागेल. ट्रम्प यांच्या मते, "अमेरिका आणि इराण आता ऐतिहासिक शांतता कराराच्या अगदी जवळ आहेत. बहुतेक वादाचे मुद्दे सुटले असून, दोन आठवड्यांचा काळ अंतिम करारासाठी पुरेसा असेल."

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
इराण अमेरिकामध्ये सीजफायर, 15 दिवस हल्ला करणार नाही, कोणत्या अटी घातल्या?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल