Mehrnews.com च्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यात सध्या कोणत्याही जखमी किंवा मृत्यूची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यामुळे तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, सीरियाच्या अल-हसका प्रांतातील अमेरिकन लष्करी तळावर इराण समर्थित गटांनी क्षेपणास्त्र हल्ला केला.
इस्रायल थरथरलं,11 दिवसांतील सर्वात मोठा हल्ला; प्रमुख वीज केंद्र उद्ध्वस्त
advertisement
कुठे आहे अमेरिकन सैन्याची तैनाती?
अमेरिकन सैन्य 2014 पासून सीरियामध्ये तैनात आहे. त्यांचं प्रमुख उद्दिष्ट इस्लामिक स्टेट म्हणजेच आयएसआयएसचा नायनाट करणं आहे. सध्या अंदाजे 2,000 अमेरिकन सैनिक सीरियामध्ये तैनात आहेत आणि हे सैनिक उत्तर-पूर्व सीरियामधील कुर्द नेतृत्वाखालील Syrian Democratic Forces (SDF) सोबत काम करत आहेत. हे सैनिक अल-तनफ, शद्दादी, रुमालिन लँडिंग झोन आणि खराब अल-जिरसारख्या प्रमुख लष्करी ठिकाणांवर तैनात आहेत.
