या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय इस्त्रायलने इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी यांचं निवासस्थान आणि कार्यालयाला देखील टार्गेट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा खामेनी हे तेहरानमध्ये नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. तूर्तास या हल्ल्यात नेमकी किती जीवितहानी झाली, कोण ठार झालं, याची अधिकृत माहिती समोर येत नसली तरी दोन्ही देशांमध्ये युद्धाला तोंड फुटलं आहे.
advertisement
इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर या युद्धात अमेरिका आणि सीरियाने देखील उडी घेतली आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी देखील इराणवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. तर इराणच्या बाजुने सीरीया मैदानात उतरलं आहे. अमेरिकेकडून इराणमध्ये 'शिल्ड ऑफ जुदा' ऑपरेशनला सुरुवात केली आहे, याबाबतची माहिती स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या होत्या.
इराणने अणुबॉम्ब बनवू नये, यासाठी अमेरिकेचा इराणवर दबाव होता. तसेच इराणने देशातील अणुभट्ट्या बंद कराव्यात, असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ही चर्चा फिसकटल्यानंतर आता अमेरिकेनं देखील इराणमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. इराणचं नौदल उद्ध्वस्त करून टाकू, शरण या किंवा मरा, अशा कडक शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.
या हल्ल्यानंतर इस्त्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये सायरन वाजवले. तसेच आणीबाणी जाहीर केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांवर निर्बंध देखील घातले आहेत.
