TRENDING:

Israel strikes: येमेनच्या राजधानीवर महाभयंकर हल्ला; इस्रायलने पेट्रोल टाकी, वीज केंद्र उडवले,शहर थरथरले

Last Updated:

Israel Airstrikes: इस्रायलने येमेनच्या राजधानी सना आणि हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले. रात्रीभर चाललेल्या बॉम्बवर्षावामुळे राष्ट्राध्यक्ष भवन, सैनिकी तळ, वीज केंद्र उद्ध्वस्त झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सना: इस्रायलने रविवारी येमेनची राजधानी सना येथे हूती सैन्याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचे जाहीर केले. इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार हे हल्ले राष्ट्रपती भवनाजवळील परिसर, वीज प्रकल्प आणि इंधन साठवण सुविधा अशा ठिकाणी करण्यात आले.
News18
News18
advertisement

इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले की, अलीकडच्या काही दिवसांत हूती दहशतवादी संघटनेने इस्रायलवर व त्याच्या नागरिकांवर केलेल्या पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्र आणि मानवरहित हवाई वाहन (UAVs) हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हे हवाई हल्ले करण्यात आले.

स्थानिक सना रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हल्ले राष्ट्रपती भवनाजवळील संकुल, क्षेपणास्त्र तळ तसेच तेल व वीज प्रकल्पांवर केंद्रित होते. हूतीच्या माध्यम संस्था ‘अल-मसीराह टीव्ही’ने सांगितले की- या हवाई हल्ल्यात किमान दोन लोक ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. हे हल्ले एका तेल कंपनीच्या सुविधेवर झाल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली.

advertisement

इस्रायल एअर फोर्स (IAF) ने सांगितले की- त्यांच्या लढाऊ विमानांनी हूती दलांच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. यामध्ये राष्ट्रपती भवन असलेले लष्करी संकुल, असार आणि हिजाझ वीज प्रकल्प तसेच इंधन साठवण सुविधा यांचा समावेश आहे. हे सर्व ठिकाण हूतीच्या लष्करी मोहिमांसाठी वापरले जात असल्याचा दावा करण्यात आला.

सना येथील राष्ट्रपती भवन हे हूतीच्या लष्करी ऑपरेशन्सचे मुख्यालय आहे. तर हिजाझ आणि असार वीज प्रकल्प लष्करी कारवायांसाठी मोठे विद्युत पुरवठा केंद्र म्हणून वापरले जातात. या प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यामुळे लष्करी उद्देशांसाठी आवश्यक असलेले वीज उत्पादन आणि पुरवठा विस्कळीत झाला आहे. हे पुन्हा एकदा दाखवते की हूती दहशतवादी गट नागरी पायाभूत सुविधांचा वापर लष्करी हेतूसाठी करत आहे, असे इस्रायली वायुदलाने स्पष्ट केले.

advertisement

इस्रायलने हूती गटावर इराणच्या मार्गदर्शनाखाली आणि निधीच्या आधारे कारवाया करण्याचा आरोप केला. तसेच हा गट जागतिक जहाजवाहतुकीवर हल्ले करण्यासाठी समुद्री मार्गांचा वापर करतो, असेही म्हटले.

IAF ने इशारा दिला की, हूती दहशतवादी गटाकडून इस्रायलवर होणाऱ्या सततच्या आणि पुनरावृत्ती होत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून IDF (Israel Defense Forces) कठोरपणे कारवाई करेल आणि इस्रायलच्या नागरिकांच्या सुरक्षेला धोका देणाऱ्या प्रत्येक हल्ल्यावर, कुठल्याही अंतरावर, ठाम प्रत्युत्तर देईल.

advertisement

दरम्यान, शुक्रवारी हूती गटाने इस्रायलवर लक्ष्य साधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले होते. या क्षेपणास्त्रात अनेक उपस्फोटके होती जी लक्ष्यावर आदळल्यावर स्फोट व्हावेत, अशा हेतूने बसवली होती. येमेनहून अशा प्रकारचे क्षेपणास्त्र प्रथमच प्रक्षेपित झाले आहे, असेही अधिकाऱ्याने नमूद केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

ऑक्टोबर 2023 मध्ये गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलने युद्ध सुरू केल्यापासून इराणसमर्थक हूती गटाने लाल समुद्रात जहाजांवर हल्ले सुरू केले आहेत. हे ते पॅलेस्टिनींच्या ऐक्याच्या नावाखाली करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी इस्रायलवर वारंवार क्षेपणास्त्र प्रक्षेपण केले आहे, ज्यापैकी बहुतांश अडवण्यात आले . इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून हूती नियंत्रित भागांवर आणि महत्त्वाच्या होदेईदा बंदरावरही हल्ले केले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Israel strikes: येमेनच्या राजधानीवर महाभयंकर हल्ला; इस्रायलने पेट्रोल टाकी, वीज केंद्र उडवले,शहर थरथरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल