इराणी राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांनंतर अनेक भागांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आल्या होत्या. तेहरानमध्ये पाश्तूर चौकासारख्या अतिसंवेदनशील परिसरात अज्ञात हवाई लक्ष्यांचा शोध घेण्यात आला. या परिसरात इराणचे सर्वोच्च नेते आणि राष्ट्रपती कार्यालय आहे.
हल्ल्यानंतर इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एयाल झमीर यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की,आमचं लष्कर पूर्ण ताकदीने आणि जलदगतीने आमच्या उद्दिष्टांची पूर्तता करत आहे.
advertisement
दरम्यान हल्ल्याच्या वेळेसच जेरुसलेममध्येही एअर रेड सायरन वाजले. इस्रायली लष्कराने नंतर स्पष्ट केलं की यमनहून इस्रायलच्या दिशेने एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. जेरुसलेममध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं स्थानिकांनी सांगितलं. जे पूर्वीच्या मिसाइल अडवण्याच्या घटनांप्रमाणेच होते.
हा हल्ला आणि यमनहून आलेले क्षेपणास्त्र हे या संपूर्ण संघर्षाचे क्षेत्रीय स्वरूप अधोरेखित करतात आणि मध्य पूर्वेतील परिस्थिती अजूनच चिघळल्याचे संकेत देतात.
