सकाळी सुमारे 10 वाजता ईस्ट 95 स्ट्रीट आणि 2 ॲव्हेन्यूजवळ हा स्फोट झाला. ज्यामुळे तिथे मोठा आगडोंब उसळला. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये या स्फोटानंतर आकाशात धुराचे मोठे लोट पसरलेले दिसत आहेत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी 100 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान आणि बचावकर्ते तातडीने दाखल झाले आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 15, 2025 9:37 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
न्यूयॉर्क हादरलं, मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साइडमध्ये भयंकर स्फोट; लोकांमध्ये दहशत,धुराच्या ढगाखाली आकाश काळवंडलं
