रेड स्टार न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 66 वर्षीय झोउ नावाच्या व्यक्तीचा स्थानिक रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रात 'अक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन' (Acute Myocardial Infarction) म्हणजेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै 2024 रोजी चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातील पिंगनान काउंटी येथील एका हॉटेलमध्ये झोउने त्याची प्रेयसी झुआंग हिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. या घटनेच्या काही तासांनंतरच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
झोउची पत्नी आणि मुलाने झोउला वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल हॉटेल आणि झुआंग यांच्यावर खटला दाखल केला होता. त्यांनी 5.5 लाख रुपयांची मागणी केली होती. ज्यात न्यायालयाने अंत्यसंस्कारासाठी 70,000 जोडले. ज्यामुळे एकूण रक्कम 6.2 लाख झाली. त्यानंतर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला.
झोउ आणि झुआंग यांनी 1980 च्या दशकात एका कारखान्यात एकत्र काम केले होते आणि 2023 मध्ये एका पार्टीत त्यांची पुन्हा भेट झाली. 14 जुलै 2024 रोजी झोउ हॉटेलमध्ये झुआंगला त्याच्यासोबत येण्यासाठी बोलावले. झुआंगच्या म्हणण्यांनुसार लैंगिक संबंध ठेवल्यानंतर दोघेही झोपी गेले.
झोपेतून उठल्यावर झुआंगला आढळले की झोउ श्वास घेत नव्हता. झोउचा मृत्यू झाला आहे असे वाटून ती घाबरली आणि तिला काय करावे हे सुचले नाही. झुआंगला स्वतःला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने ती आधी घरी जाऊन रक्तदाब कमी करण्याच्या गोळ्या घेण्यासाठी गेली. सुमारे एक तासानंतर ती हॉटेलमध्ये परतली आणि तिला रूम उघडता न आल्यामुळे तिने हॉटेल कर्मचाऱ्याची मदत घेतली. खोलीत शिरल्यावर त्यांनी झोउला हाक मारली, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. हॉटेल कर्मचाऱ्याने रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले. नंतर डॉक्टर आणि पोलिसांनी झोउचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांना तपासामध्ये असेही आढळले की, झोउला स्वतःला उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि त्याला यापूर्वी हृदयविकाराचा झटकाही आला होता.
न्यायालयाने असे सांगितले की, झोउचा मृत्यू त्याच्या आधीपासून असलेल्या आजारांमुळे झाला होता. त्यामुळे याची मुख्य जबाबदारी त्याचीच होती. झुआंगला झोउच्या आधीच्या आजारांबद्दल माहिती नसल्यामुळे तिला केवळ दुय्यम जबाबदारी (secondary responsibility) साठी दोषी ठरवण्यात आले.
न्यायालयाने म्हटले की झुआंगने खोली सोडून एक तासानंतर परत येण्यामुळे त्याला वाचवण्याची उत्तम संधी गमावली. याशिवाय झोउ विवाहित असल्याचे माहीत असूनही त्याच्यासोबत संबंध ठेवल्याने तिने सार्वजनिक सुव्यवस्था आणि चांगल्या चालीरीतींचे उल्लंघन केल्याचेही न्यायालयाने म्हटले. शेवटी न्यायालयाने झुआंगने कुटुंबाला मागितलेल्या एकूण 6.2 लाख रुपयांपैकी 10% रक्कम भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. हॉटेलमध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याने आणि ती सार्वजनिक जागा नसल्याने हॉटेलची कोणतीही चूक नाही आणि त्यांना कोणतीही भरपाई देण्याची आवश्यकता नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
