कॅलिफोर्निया: अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात चेवरॉन (Chevron) कंपनीच्या एल सेगुंडो ऑइल रिफायनरीमध्ये भीषण आग लागली. ही रिफायनरी अमेरिकेच्या वेस्ट कोस्टमधील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या रिफायनरींपैकी एक आहे. आगीपूर्वी मोठा स्फोट झाल्याचा आवाज स्थानिक लोकांनी ऐकला होता. कंपनीने स्पष्ट केले आहे की- सर्व कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
advertisement
सर्व कर्मचारी सुरक्षित
सर्व कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टर्स सुरक्षितरीत्या बाहेर काढले गेले आहेत. कोणालाही दुखापत झालेली नाही. कंपनीची फायर ब्रिगेड व इमर्जन्सी टीम्स घटनास्थळी तैनात असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने काम करत आहेत, असे चेवरॉन कंपनीने निवेदनात सांगितले.
स्थानिक प्रशासनाची प्रतिक्रिया
कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गेविन न्यूजम यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयाने सांगितले की- राज्य व स्थानिक यंत्रणा मिळून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत आणि आसपासच्या लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. अद्यापपर्यंत परिसरात इव्हॅक्यूएशन ऑर्डर जारी केलेला नाही.
प्रदूषणावर देखरेख
रिफायनरीच्या चारही बाजूंना प्रदूषण व गॅस मॉनिटरिंग सिस्टम्स बसवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात कोणतेही धोकादायक गॅस किंवा प्रदूषण मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळलेले नाही. म्हणजे सध्या हवा किंवा वातावरणात विषारी पदार्थांचा धोका नाही.
रिफायनरीचे महत्त्व
एल सेगुंडो रिफायनरीची क्षमता दररोज सुमारे 2.9 लाख बॅरल क्रूड ऑइल रिफाइन करण्याची आहे. येथे प्रामुख्याने गॅसोलीन (पेट्रोल), जेट फ्युएल आणि डिझेल तयार केले जाते. या रिफायनरीचं लॉस एंजेलिस आणि आसपासच्या भागाच्या इंधन पुरवठ्यात मोठं योगदान आहे. त्यामुळे इथे कोणतीही दुर्घटना झाली तर संपूर्ण क्षेत्राच्या सप्लाय चेनवर परिणाम होऊ शकतो.
आगीचं कारण अज्ञात
आतापर्यंत आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेलं नाही. अधिकाऱ्यांनी तपास सुरू केल्याचं सांगितलं आहे. ऊर्जा क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना घडल्यास प्रचंड आर्थिक नुकसान होतं. मात्र या घटनेत नुकसान किती झालं याचा अंदाज अजून लागलेला नाही.
किती मोठी रिफायनरी आहे?
एल सेगुंडो (El Segundo), कॅलिफोर्निया येथे असलेली ही रिफायनरी अमेरिकेच्या वेस्ट कोस्टवरील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक आहे. दररोज 2.9 लाख बॅरल क्रूड ऑइल प्रोसेस करण्याची क्षमता आहे. येथे उत्पादित होणारे गॅसोलीन, जेट फ्युएल आणि डिझेल हे संपूर्ण लॉस एंजेलिस प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
कोणाच्या मालकीची आहे?
ही रिफायनरी अमेरिकन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी Chevron (चेवरॉन) ची आहे. चेवरॉन ही अमेरिकाातील दुसरी सर्वात मोठी ऑइल कंपनी असून, तिचं जगभर मोठं नेटवर्क आहे. कंपनीच्या मते, रिफायनरी परिसरात बसवलेल्या मॉनिटरिंग सिस्टम्समुळे गॅस लीक किंवा प्रदूषण याची तात्काळ माहिती मिळू शकते.
क्रूड ऑइलच्या किमतींवर परिणाम
अल्पकालीन काळात या घटनेमुळे अमेरिकेच्या वेस्ट कोस्टमधील इंधन बाजारात अनिश्चितता निर्माण होऊ शकते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलच्या किमतींवर फारसा परिणाम होणार नाही. कारण ग्लोबल मार्केटमध्ये पुरवठ्याचे अनेक स्रोत आहेत.
मात्र जर ही आग दीर्घकाळ रिफायनरीच्या क्षमतेवर परिणाम करत राहिली, तर स्थानिक बाजारात गॅसोलीन आणि डिझेलच्या किंमती वाढू शकतात. विशेषतः कॅलिफोर्नियामध्ये जिथे इंधनाचे दर आधीच जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतींवर परिणाम तेव्हाच होईल. जेव्हा ही घटना पुरवठा साखळीवर दीर्घकाळ परिणाम करेल.