महासचिव मार्क रुटे यांचा दावा केला आहे की, जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर त्याआधी पुतिन कोणत्यातरी नाटो देशावर हल्ला करून युरोपला अडकवतील, जेणेकरून चीनची वाट मोकळी होईल.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रुटे म्हणाले, जर शी जिनपिंग तैवानवर हल्ला करणार असेल, तर तो आधी आपला भागीदार व्लादिमीर पुतिनला कॉल करून सांगेल – मी हे करणार आहे, तू युरोपमध्ये नाटोला अडकव.’” हा इशारा ब्रुसेल्समधील नाटो समिटदरम्यान दिला गेला आणि यामागची रणनीती धक्कादायक आहे.
advertisement
चीन आधीपासूनच तैवानला आपलाच भाग मानत आला आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग हे उघडपणे सांगत आहेत की, गरज भासल्यास लष्करी बळावर एकत्र आणलं जाईल. पण तैवानची जनता आजचा स्वतंत्र दर्जा योग्य मानते. आता जर चीनने हल्ला केला आणि त्याच वेळी रशिया युरोपमध्ये कुठे तरी हल्ला करेल. अशा परिस्थितीत अमेरिका आणि नाटो हे दोन्ही आघाड्यांवर विभागले जातील.
चीन-रशियाच्या या प्लानला NATO कसं सामोरं जाणार?
रुटे यांच्या मते, हाच सर्वात मोठा धोका आहे आणि हे रोखण्यासाठी नाटोने आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे. ते म्हणाले, आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक – नाटोला इतकं बळकट करावं की रशियाने हल्ला करण्याचा विचारही करू नये. आणि दुसरे – इंडो-पॅसिफिकसोबत भागीदारी मजबूत करावी. जे ट्रम्प आधीच करत आहेत.
रुटे यांनी हेही स्पष्ट केलं की ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ नीती असूनही, ते इंडो-पॅसिफिकमधील भागीदारीला प्राधान्य देत आहेत. त्यांनी ट्रम्पच्या डिफेन्स टीमचं कौतुक करताना मार्को रुबिओ आणि पीट हेगसेथ यांसारख्या नेत्यांना ‘उत्कृष्ट परराष्ट्र धोरण टीम’ असं म्हटलं.
‘डॅडी’ ट्रम्प वाचवायला येतील का?
स्वतः रुटे यांना यापूर्वी एका वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जावं लागलं होतं, ज्यात त्यांनी ट्रम्प यांना ‘डॅडी’ असं संबोधलं होतं, तेव्हा ट्रम्प यांनी इस्रायल-इराण संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मोठा प्रश्न हाच आहे की, जर चीन-रशिया यांनी असा दुहेरी डाव प्रत्यक्षात आणला, तर अमेरिका आणि नाटो हे थोपवू शकतील का?