हा शोध अशा वेळी समोर आला आहे जेव्हा जग अजूनही कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनशी लढत आहे. कोविड-19 चा पहिला रुग्ण 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात आढळला होता आणि त्याच शहरातील वुहान व्हायरस रिसर्च सेंटर वटवाघळामधून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संशोधनामुळे कुख्यात झाले होते. आता पुन्हा एकदा वटवाघळामधूनच अशाच 22 जीवघेण्या विषाणूंचा धोका निर्माण झाला आहे. जे माणसाला आधी मानसिकरित्या विकृत करतात आणि नंतर तडफडवून मृत्यूकडे नेतात.
advertisement
वटवाघळामध्ये सापडले 20 विषाणू
चीनमधील संशोधकांनी वटवाघळामध्ये किमान 20 नवीन विषाणू शोधून काढले आहेत. जे भविष्यात माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. युनान प्रांतात 2017 ते 2021 या काळात 142 वटवाघळाच्या मूत्रपिंडातील ऊतींच्या तपासणीतून हे 22 विषाणू आढळले. यापैकी दोन विषाणू हेन्ड्रा आणि निपाह यांच्याशी मिळतेजुळते आहेत. तसेच एका अज्ञात जीवाणू आणि क्लोसिएला युन्नानेंसिस नावाच्या परजीवीचीही नोंद झाली आहे.
हे वटवाघूळ फळबागांमध्ये आणि गावांजवळ राहत असल्याने त्यांच्या मूत्रामुळे फळे दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विषाणू सहजपणे फळांद्वारे किंवा पाण्यातून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये पसरू शकतात.
संक्रमण खूपच सहजपणे होऊ शकते
हे विषाणू – युन्नान बॅट हेनीपा व्हायरस 1 आणि 2 – याआधी पूर्णपणे अज्ञात होते. यांचे जनुकीय घटक इतर हेनीपा विषाणूंशी 52 ते 57 टक्के मिळतेजुळते आहेत. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की हे विषाणू अन्न किंवा पाण्याद्वारे माणसांपर्यंत पोहोचू शकतात, म्हणजेच त्यांचे संक्रमण फारच सहज आणि वेगाने होऊ शकते.
कोरोनासारखी श्वसनाची गंभीर लक्षणे निर्माण होण्याबरोबरच, हे विषाणू मेंदूमध्ये सूज निर्माण करू शकतात, जे थेट मस्तिष्काच्या नुकसानात परिणत होऊ शकते.
किती घातक आहेत हे विषाणू?
हे सर्व विषाणू वटवाघळाच्या मूत्रपिंडात सापडले असून त्यांचा प्रसार माणसांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे गंभीर आजार निर्माण करू शकतात. आतापर्यंत कोणत्याही नव्या आजाराची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र या संशोधनाला गंभीरतेने घेतले जात आहे.
या संशोधनात किमान 20 नवे विषाणू त्यातले दोन हेनीपा प्रकार आणि एक परजीवी सापडला असून भविष्यात त्यांच्याकडून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
