पाकिस्तानमधील शिक्षणाचा दर्जा काय आहे?
UNICEF च्या एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये 5–16 वयोगटातील सुमारे 2 कोटी 28 लाख मुलं शाळेबाहेर आहेत. जे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक आहे. हा आकडा देशातील एकूण मुलांच्या लोकसंख्येच्या सुमारे 44% इतका आहे. UNESCO‑GEM चा अहवाल सांगतो की मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत पाकिस्तानची प्रगती अत्यंत धीमी आहे आणि दक्षिण-पश्चिम आशियामधील सर्वात कमकुवत स्थितीत आहे. सरकारी खर्च जीडीपीच्या फक्त 1.9% ते 2.1% दरम्यान आहे. जी UNESCO च्या 4% च्या शिफारशीच्या खूपच खाली आहे.
advertisement
सर्वात घातक फायटर जेटचे Emergency लँडिंग, रात्री 9:30 वाजता Airportवर काय घडले
शहबाज यांनी सोशल मीडियावर काय लिहिलं होतं?
मी अत्यंत तीव्रतेने आणि ठामपणे, कोणत्याही उकसाव्याशिवाय इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्याची condemn (त्यांच्या पोस्टमध्ये चुकून condom लिहिलं) करतो. या हल्ल्यात इराणच्या लोकांचा मृत्यू झाला याबद्दल माझ्या संवेदना त्यांच्या परिवारांसोबत आहेत. हा प्रकार अतिशय गैरजबाबदार असून आधीच नाजूक असलेल्या या परिसराला अधिक अस्थिर करेल. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांकडे विनंती करतो की, हे रोखण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
Israelचा ऑन-एअर हल्ला, Live शोमध्ये स्टुडिओ उद्ध्वस्त; अँकर घाबरून पळाली, Video
शहबाज यांनी त्वरित पोस्ट डिलीट केली
सोशल मीडियावर थट्टा होत असल्याचं लक्षात येताच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तत्काळ ही पोस्ट डिलीट केली. मात्र तोपर्यंत जे व्हायचे होते ते झालेच होते. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टचे स्क्रीनशॉट्स घेतले गेले आणि ते सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत. काहींनी ही पोस्ट एडिट करून बनवली गेली का, असा प्रश्नही उपस्थित केला. यावर X च्या AI प्रणाली Grok ला विचारण्यात आलं. त्याने सांगितलं की, आम्ही डिलीट झालेली पोस्ट पुन्हा दाखवू शकत नाही. पण 13 जूनच्या त्या पोस्टविषयी चर्चा सुरू असून, ती पोस्ट खरीच होती असं मानलं जात आहे.
