TRENDING:

पुतिनकडून शहबाज शरीफ यांचा इयरफोन क्लास, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फजितीचा Video

Last Updated:

Pakistan PM Shehbaz Sharif: बीजिंगमध्ये झालेल्या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ पुन्हा एकदा इयरफोनमुळे गोंधळले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतःच त्यांना इयरफोन कसा लावायचा हे दाखवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

बीजिंग: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट बीजिंगमध्ये झाली. या भेटीचा एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

बैठकीदरम्यान शहबाज शरीफ यांना भाषांतरासाठी दिलेले इयरफोन योग्यरित्या कानात बसवता येत नव्हते. ते वारंवार खाली घसरत होते. हा प्रसंग पाहून पुतिन स्वतःच हसले आणि त्यांनी आपला हेडसेट उचलून शरीफ यांना योग्य पद्धतीने इयरफोन कसा लावायचा हे दाखवून दिले. या वेळी दोघांच्या चेहऱ्यावर स्मित होते.

advertisement

2022 मध्येही असाच प्रकार

ही पहिलीच वेळ नाही. तीन वर्षांपूर्वी 2022 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. त्या वेळीही पुतिन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान शरीफ यांना आपले इयरफोन व्यवस्थित लावता येत नव्हते. हेडफोन सतत खाली घसरत होते. अनेकदा प्रयत्न करूनही समस्या काही वेळ कायम राहिली. तेव्हा पुतिन हसू आवरता आले नाही.

advertisement

advertisement

उतावळेपणा

याच वर्षी तियानजिन येथे झालेल्या SCO परिषदेतही शरीफ पुतिनकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी विशेष आतुर दिसले. 31 ऑगस्ट रोजी औपचारिक फोटोसेशननंतर पुतिन आणि जिनपिंग बाहेर पडत असताना शरीफ यांनी अचानक पुढे येऊन पुतिन यांच्याकडे हात वाढवला. जिनपिंग यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पुतिन परत वळले आणि शरीफ यांच्याशी हस्तांदोलन केले.

भारत-रशिया संबंधांचा गौरव

शहबाज शरीफ यांनी या भेटीत भारत-रशिया मैत्रीचे कौतुक केले. पाकिस्तान त्याचा आदर करतो, पण त्याचबरोबर रशियासोबतही मजबूत नाते निर्माण करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुतिन यांना ‘भव्य नेता’ म्हटले आणि त्यांच्या सोबत काम करण्याची तयारी व्यक्त केली.

यानंतर दोन्ही नेते बीजिंगमध्ये आयोजित एका भव्य लष्करी परेडमध्ये सहभागी झाले. ही परेड दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली होती. पुतिन यांनी चीनमधील या दौऱ्यावर अनेक राजनैतिक बैठकींना हजेरी लावली. त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांचीही भेट घेतली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
पुतिनकडून शहबाज शरीफ यांचा इयरफोन क्लास, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फजितीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल