न्यूयॉर्क: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Truth Social वर भारतासोबतच्या व्यापारिक नातेसंबंधांवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की अमेरिका भारतासोबत खूपच कमी व्यापार करतो, परंतु भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतो. भारताने आतापर्यंत अतिशय उच्च टॅरिफ (आयात शुल्क) लावले आहेत, ज्यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे शक्य झाले नाही. ट्रम्प यांनी या नात्याला पूर्णपणे एकतर्फी आपत्ती (one-sided disaster) असे संबोधले आहे.
advertisement
ट्रम्प यांची टीका
ही गोष्ट फार कमी लोकांना कळते की आपण भारतासोबत खूपच कमी व्यापार करतो. पण भारत आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात व्यापार करतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर ते आपल्याला प्रचंड प्रमाणात वस्तू विकतात. आपण त्यांचे सर्वात मोठे ग्राहक आहोत, पण आपण त्यांना फारच कमी विकतो. आतापर्यंत हे नाते पूर्णपणे एकतर्फी राहिले आहे आणि अनेक दशकांपासून असेच चालू आहे, असे ट्रम्प म्हणाले.
भारताचे टॅरिफ सर्वाधिक
ट्रम्प यांनी पुढे म्हणाले की- भारताने आतापर्यंत आमच्यावर इतके उच्च टॅरिफ लावले आहेत; जे इतर कोणत्याही देशाने लावलेले नाहीत. त्यामुळे आमचे व्यवसाय भारतात वस्तू विकूच शकले नाहीत. हे पूर्णपणे एकतर्फी आपत्तीचं उदाहरण आहे. त्यासोबतच भारत आपला बहुतांश तेल आणि लष्करी उत्पादने रशियाकडून खरेदी करतो, अमेरिकेकडून फारच कमी. आता त्यांनी टॅरिफ शून्यापर्यंत कमी करण्याची ऑफर दिली आहे. पण आता खूप उशीर झाला आहे. हे त्यांना अनेक वर्षांपूर्वी करायला हवे होते.
भारतात 50 टक्के टॅरिफ
ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर आयात शुल्क (टॅरिफ) वाढवून 50 टक्के केले आहे. ज्यात 25 टक्के प्रतिसादात्मक शुल्क (reciprocal tariff) आणि अतिरिक्त दंड भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्यावर म्हणून लावला आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका नातेसंबंधांमध्ये मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारत या पावलाला अन्यायकारक आणि रोजगारावर झालेला आघात असे मानत आहे. मात्र भारत रशिया आणि चीनसोबत सहकार्य वाढवत आहे. ज्यामुळे भूराजकीय (geopolitical) समतोल बदलत असल्याचे दिसून येत आहे.
