रशियाने दावा केला की हा हल्ला युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडरवेब’चा प्रतिउत्तर होता. ज्यात 1 जूनला युक्रेनने रशियातील चार महत्त्वाच्या विमानतळांवर ड्रोन हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये रशियाला 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी याला प्रत्युत्तर देण्याची इशारा दिला होता. मात्र युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियाचे हे हल्ले ‘बदला’ नसून ‘विनाशाची कृती’ आहे.
advertisement
रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून नाटो देश पोलंड आणि त्याच्या मित्र देशांनी पश्चिम युक्रेनच्या जवळच्या त्यांच्या हवाई हद्देच्या सुरक्षेसाठी फायटर जेट्स उडवले. पोलंडच्या लष्कराने सांगितलं, हा निर्णय सीमावर्ती भागांच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. युक्रेनमध्ये संपूर्ण रात्री हवाई हल्ल्याचा इशारा दिला जात होता.
रशियाला आघाडी मिळाली
रशियाने दावा केला आहे की त्याच्या सैन्याने पूर्व-मध्य युक्रेनमधील दिनिप्रोपेत्रोव्ह्स्क क्षेत्राच्या सीमेपर्यंत मजल मारली आहे. जे तीन वर्षांच्या युद्धात पहिल्यांदाच घडलं आहे. रशियन सैन्य आता डोनेट्स्कमधील कोस्त्यांतिनिव्का शहराच्या दिशेने पुढे सरकत आहे. जे युक्रेनचं महत्त्वाचं लॉजिस्टिक केंद्र आहे. याशिवाय रशियन सेना सुमी शहराच्या जवळही पोहोचली आहे. जे कीवपासून 321 किमी अंतरावर आहे. रशियाने सुमीमधील लोक्निया गावही परत ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.
युद्धविरामाची वाट कठीण
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धविरामावरील चर्चा ठप्प झाली आहे. दोन्ही देशांमधील मृत सैनिकांचे मृतदेह आणि युद्धबंदकांची देवाणघेवाण यावरही वाद सुरू आहे. रशियाचं म्हणणं आहे की युक्रेन 12,000 मृतदेह आणि बंदकांची अदलाबदल करण्यास विलंब करत आहे. तर झेलेन्स्कींचं म्हणणं आहे की रशियाने 1,000 पेक्षा अधिक कैद्यांची नावं अजून पाठवलेली नाहीत.