TRENDING:

Russia Ukraine War: फक्त 12 किलोमीटर... युक्रेनच्या सर्वात मोठ्या शहरावर रशियाचा ताबा; 50 हजार सैन्याचा शहर भोवती कब्जा

Last Updated:

Russia Ukraine War: रशियाचे सैन्य सुमी शहरापासून 12 किमी दूर असून 50 हजार सैनिकांची तैनाती केली आहे. युक्रेनचे सैनिक पिछाडीवर आहेत. अमेरिकेच्या आवाहनानंतरही रशियाने जोरदार हल्ले केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमी: रशियाचे सैन्य आता युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी शहरापासून केवळ 12 किलोमीटर दूर आहे. रशियाने युक्रेनच्या तुलनेत तीनपट अधिक सैन्य तैनात केले असून हे सैन्य वेगाने पुढे सरकत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, रशियाने आता आपले संपूर्ण लक्ष सुमी सीमावर्ती भागावर केंद्रित केले आहे. सुमी शहराकडे रशियाचे 50 हजार सैनिक वाटचाल करत आहेत.
News18
News18
advertisement

रशियाच्या या जबरदस्त मोर्चेबांधणीसमोर युक्रेनचे सैनिक लढाईत पिछाडीवर पडले आहेत. युक्रेनचे सर्वोच्च लष्करी कमांडर जनरल अलेक्झांडर सिर्स्की यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितले की, रशियाने मोठ्या प्रमाणावर सैनिक उतरवून आमची ताकद कमकुवत करण्याची मुख्य रणनीती आखली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतरही रशियाने सुमी शहरावर अलीकडेच अतिशय जबरदस्त हल्ला केला. गेल्या आठवड्यात तुर्कस्तानमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये युद्धविरामाबाबत चर्चा झाली होती. पण त्या चर्चेत काही निष्पन्न झाले नाही. त्याचवेळी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे जोरदार हल्ले केले. युक्रेनचे एफ-16 लढाऊ विमान आणि त्याचा वैमानिक रशियाने पाडला होता.

advertisement

युक्रेनने या महिन्याच्या सुरुवातीला HUR कमांडोंना मोर्चावर पाठवले होते. युक्रेनच्या सर्वोच्च सैन्य कमांडरने सांगितले की, आम्ही सध्या जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि शत्रूला मागे ढकलण्यासाठी रणनीती आखत आहोत.

रशियाची तीनपट मोठी सेना युक्रेनसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. सैन्य कमांडर म्हणाले, या मोर्च्यावर युक्रेनच्या सेनेला रशियासमोर टिकणे सोपे नाही. त्यांची तीनपट मोठी सेना आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. तरीही आम्ही खंबीरपणे लढत आहोत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

जून महिन्याच्या सुरुवातीला सुमी शहरातील एका गावावर रशियाच्या सैनिकांनी ताबा मिळवला होता. यावेळी दोन्ही सेनेमध्ये भीषण युद्ध झाले. 25 वर्षीय प्लाटून कमांडर अलेक्झांडर सिर्स्की यांनी सांगितले, मी आजवरचा सर्वात क्रूर संघर्ष अनुभवला. रशियन सैनिक ड्रोन, ग्रेनेड आणि मशीन गनने आमच्यावर हल्ला करत होते. आमच्या पथकाने पाच रशियन सैनिकांना ठार केले. आम्ही खूप अडचणीत होतो. मात्र आम्ही सर्वजण जिवंत बचावलो, याचा मला आनंद आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Russia Ukraine War: फक्त 12 किलोमीटर... युक्रेनच्या सर्वात मोठ्या शहरावर रशियाचा ताबा; 50 हजार सैन्याचा शहर भोवती कब्जा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल