नासाच्या TESS (Transiting Exoplanet Survey Satellite) स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने संशोधकांनी 35 प्रकाशवर्ष दूर असलेल्या एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे. जिथे जीवनासाठी योग्य परिस्थिती असण्याची शक्यता आहे. या ग्रहाचं नाव आहे L 98–59 f, जो L 98–59 नावाच्या लाल बुटक्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पाच ग्रहांपैकी एक आहे. पण विशेष म्हणजे याच ग्रहामध्ये जीवनास पोषक स्थिती असू शकते असं मानलं जात आहे.
advertisement
‘हॅबिटेबल जोन’मधील नवा ग्रह
डेली मेलच्या रिपोर्टनुसार ट्रॉटियर इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एक्सोप्लॅनेट्सचे प्रमुख संशोधक चार्ल्स कैडियू यांनी सांगितले की- इतक्या कॉम्पॅक्ट सिस्टिममध्ये जीवनासाठी योग्य ग्रह सापडणे ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. हे दर्शवते की ब्रह्मांडात किती वैविध्यपूर्ण आणि अनोखे ग्रह असू शकतात.
वैज्ञानिकांच्या मते L 98–59 f ग्रहाला त्याच्या ताऱ्याकडून तितकीच उर्जा मिळते जितकी पृथ्वीला सूर्यापासून मिळते. त्यामुळे हा ग्रह ‘हॅबिटेबल जोन’मध्ये येतो. म्हणजेच तिथे द्रव पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच तिथे जीवन अस्तित्वात असण्याची आशा निर्माण होते.
हा ग्रह कसा शोधला गेला?
या लाल बुटक्या ताऱ्याची शोध 2019 मध्ये झाली आणि तेव्हा त्याभोवती चार ग्रह असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र आता डेटा अधिक बारकाईने विश्लेषण केल्यानंतर वैज्ञानिकांनी पाचवा ग्रह शोधून काढला आहे – L 98–59 f.
हा ग्रह आपल्याला थेट दिसत नाही. पण ताऱ्याच्या गतीत झालेल्या बदलांद्वारे त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत.
L 98–59 प्रणालीतील ग्रहांची वैशिष्ट्ये:
L 98–59 b – पृथ्वीपेक्षा ८४% लहान आणि निम्म्या वजनाचा ग्रह
दोन ग्रह – गुरूच्या ज्वालामुखी चंद्र Io सारखे म्हणजे प्रचंड ज्वालामुखी क्रियाशीलता असलेले
चौथा ग्रह – एक ‘जलमय जग’ (Water World) असण्याची शक्यता
‘सुपर-अर्थ’पासून ‘वॉटर वर्ल्ड’पर्यंत
या शोधामागील टीम आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप वापरून संपूर्ण प्रणालीचा अधिक सखोल अभ्यास करणार आहे. या संशोधनात सहभागी असलेले रेने डॉयोन म्हणाले- 'सुपर-अर्थ' आणि 'सब-नेपच्यून' ग्रह कोणत्या घटकांपासून बनलेले असतात? लहान ताऱ्यांच्या आजूबाजूला ग्रहांची निर्मिती कशी होते?" अशा प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो. जी आपल्याला जीवनाच्या शोधाच्या अधिक जवळ नेऊ शकतात.
ही शोधमोहीम केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही, तर ती आपल्या ‘एकटे आहोत की नाही?’ या प्रश्नाच्या उत्तराच्या अत्यंत जवळ पोहोचण्याचा प्रयत्न मानली जात आहे. L 98–59 f हा ग्रह कदाचित भविष्यात मानवाच्या ‘दुसऱ्या घराचं स्वप्न’ साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतो.
