या भागात 7.0 आणि 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप झाले. मात्र यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता. मात्र सकाळी 8:49 वाजता आलेल्या 7.4 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे USGS ने इशारा दिला की, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किलोमीटर (186 मैल) परिसरात धोकादायक त्सुनामी लाटा येऊ शकतात.
Marketमध्ये असा डबल धमाका प्रथमच, स्पेशल डिव्हिडेंड सोबत मिळणार बोनस शेअर्स
advertisement
तत्काळ कोणत्याही जखमी किंवा मृत्यूबाबतच्या घटना नोंदवल्या गेल्या नव्हत्या. या सुरुवातीच्या भूकंपांनंतर अनेक आफ्टरशॉक्सही जाणवले, ज्यात आणखी एक 6.7 तीव्रतेचा भूकंप समाविष्ट होता, असे USGS ने सांगितले. भूकंपाचे केंद्रबिंदू हे कामचात्का प्रदेशाची राजधानी पेट्रोपावलोव्स्क-कामचात्स्कीच्या पूर्वेस सुमारे 140 किलोमीटर अंतरावर होते.
रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने टेलिग्रामवर सांगितले की, बियरिंग समुद्राच्या दक्षिण-पश्चिमेकडील कमांडर आयलंड्समध्ये 60 सेंटीमीटरपर्यंतच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तर कामचात्का द्वीपकल्पात 15 ते 40 सेंटीमीटर उंचीच्या लाटा येऊ शकतात.
दरम्यान जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइंसेस (GFZ) ने रविवारी कामचात्काच्या किनाऱ्यालगत 6.5 पेक्षा अधिक तीव्रतेचे दोन भूकंप झाल्याची नोंद केली. त्यांच्या मते या भूकंपांची तीव्रता अनुक्रमे 6.6 आणि 6.7 होती आणि दोन्ही भूकंपांचे केंद्र सुमारे 10 किलोमीटर (6 मैल) खोलीवर होते.
कामचात्का द्वीपकल्प हे पॅसिफिक आणि नॉर्थ अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमावर वसलेले असल्यामुळे हा भाग भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. 1900 पासून येथे 8.3 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे सात प्रमुख भूकंप झाले आहेत.
4 नोव्हेंबर 1952 रोजी कामचात्कामध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात काही नुकसान झाले होते.पण मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र या भूकंपामुळे हवाई बेटांवर तब्बल 9.1 मीटर (30 फूट) उंच लाटा उसळल्या होत्या. अलास्का हे अमेरिकेचे राज्य बियरिंग समुद्राच्या दुसऱ्या टोकाला आहे.मात्र यावेळी झालेल्या भूकंपात कोणतेही अमेरिकन भूभाग त्सुनामी अलर्ट झोनमध्ये नव्हते.
