TRENDING:

Power is Power: वॉल स्ट्रीट हादरलं, ट्रम्प यांनी मस्कला जागा दाखवली; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण

Last Updated:

Trump vs Musk: ट्रम्प-मस्क वादामुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये 8% घसरण झाली. ट्रम्प यांनी मस्कला अमेरिकेतून हद्दपार करण्याची धमकी दिली, ज्यामुळे वॉल स्ट्रीटवरही परिणाम झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: ‘Power is Power’... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील हा डायलॉग अक्षरशः खरा करून दाखवला आहे. सतत कोणत्यातरी व्यक्तीशी वाद घालणारे ट्रम्प यावेळी थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्याशी भिडले आहेत. आणि बाजारातील परिस्थिती पाहता पहिली फेरी ट्रम्प यांच्या नावावर गेली आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
News18
News18
advertisement

टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्स मंगळवारी बाजार खुलताच 8% घसरले आणि $293.21 या दिवसातील नीचांकी पातळीवर पोहोचले. NASDAQ वर 11 कोटींहून अधिक शेअर्सची जोरदार विक्री झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली.

मस्क-ट्रम्प संघर्ष: नक्की काय घडलं?

ही घसरण एलन मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वादामुळे घडली. ट्रम्प यांनी मस्कला अमेरिकेतून हद्दपार करण्याची धमकी दिली. कारण? मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावित “One Big Beautiful Bill” या योजनेला “विनाशकारी आणि मूर्खपणाची” म्हणत त्यावर टीका केली.

advertisement

ट्रम्प यांनी प्रत्युत्तरात पत्रकार परिषदेत सांगितले, DOGE मुळे एलनचा खेळ खतम होईल. DOGE म्हणजे ‘Department of Government Efficiency’, ज्याचे मस्क 2025 पर्यंत प्रमुख होते.

ट्रम्प यांनी काय केलं?

ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर टीका करताना स्पष्टपणे सांगितले की, या बिलमधून EV (इलेक्ट्रिक व्हेइकल) सबसिडी काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मस्क चिडले आहेत. पण ते यापेक्षा खूप गमावू शकतात. त्यांनी टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांना मिळणाऱ्या सरकारी सबसिडीजवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

advertisement

वॉल स्ट्रीटही हादरले

ट्रम्प-मस्क वादाचा फटका केवळ टेस्लालाच नाही तर वॉल स्ट्रीटलाही बसला. मंगळवारी सकाळी 9:49 AM ET (भारत वेळेनुसार संध्याकाळी 7:20) पर्यंत:

डाऊ 30 – स्थिर (44,096.40)

S&P 500 – 0.23% घट (6,190.59)

NASDAQ – 0.43% घट (20,281.30)

टेस्लाच्या घसरणीमुळे संपूर्ण टेक सेक्टरवर दबाव वाढला.

टेस्लाची बिकट स्थिती

2025 हे वर्ष टेस्लासाठी खडतर ठरत आहे.

advertisement

पहिल्या तिमाहीत डिलिव्हरी 13% नी घटली – केवळ 3,36,681 गाड्या विकल्या

युरोपमध्ये विक्री सलग 5व्या महिन्यात घसरली – जर्मनीत 76%, फ्रान्समध्ये 67% घसरण

चीनमध्ये विक्री 49% नी खाली – BYD कंपनीने 90.4% वाढ दाखवली

BYD चा नवीन फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान टेस्लासाठी मोठा धोका बनलेला आहे. केवळ 5 मिनिटांत 250 मैल रेंज देणारे मॉडेल.

advertisement

मस्क यांच्या राजकीय भूमिकेचा फटका

मस्क यांचा उजव्या विचारसरणीच्या राजकीय संघटनांना समर्थन आणि ट्रम्प प्रशासनात सक्रिय सहभाग यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढली आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील टेस्ला शोरूम्सवर मोर्चे, तोडफोड आणि निषेधाचे प्रकार समोर आले आहेत.

गुंतवणूकदारांची चिंता वाढली

टेस्लाचे शेअर्स या वर्षात 44% नी घसरले

कंपनीचे मार्केट कॅप $800 अब्ज नी घटून $916 अब्जवर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

Wedbush चे विश्लेषक डॅन इव्ह्स म्हणतात, मस्क-ट्रम्प वाद टेस्लासाठी धोका बनू शकतो.

मराठी बातम्या/विदेश/
Power is Power: वॉल स्ट्रीट हादरलं, ट्रम्प यांनी मस्कला जागा दाखवली; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल