TRENDING:

बराक ओबामांवरील राष्ट्रद्रोहाच्या आरोपाने अमेरिकेत खळबळ, निवडणुकीत कट रचल्याचा गबार्ड यांचा दावा

Last Updated:

Barack Obama: अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या टीमवर ट्रम्पविरोधात कट रचल्याचा थरारक आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की 2016 च्या निवडणुकीनंतर ट्रम्पला हटवण्यासाठी बनावट गुप्तचर माहिती वापरण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक (DNI) तुलसी गबार्ड यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरावा, अशी मागणी केली आहे. गबार्ड यांनी ओबामा यांच्यावर 2016 मधील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयास बाधा आणण्याचा आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळाला कमकुवत करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
News18
News18
advertisement

तुलसी गबार्ड यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ओबामांचा उद्देश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सत्तेवरून हटवणे आणि अमेरिकन जनतेच्या इच्छेवर घाला घालणे हा होता. ते कितीही शक्तिशाली असले तरी या कटात सहभागी प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे. कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाची विश्वासार्हता यावरच अवलंबून आहे. आम्ही सर्व कागदपत्रे न्याय विभागाला (DOJ) आपराधिक चौकशीसाठी सोपवत आहोत.

advertisement

DNI कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आले की, शुक्रवारी राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी काही पुरावे सादर केले. यामध्ये दाखवले गेले की ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटनविरोधात 2016 ची निवडणूक जिंकल्यानंतर ओबामा आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकातील सदस्यांनी जाणूनबुजून गुप्तचर माहिती तयार केली आणि तिचे राजकीय स्वरूप दिले. यामागे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात एक प्रकारचा तख्तापलट घडवून आणण्याचा हेतू होता.

advertisement

चुकीच्या गुप्तचर माहितीद्वारे साजिशचा पाया?

नोव्हेंबर 2016 च्या निवडणुकीपूर्वी इंटेलिजन्स कम्युनिटीने (IC) असा निष्कर्ष दिला होता की, रशियाने सायबर पद्धतीने निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता.

7 डिसेंबर 2016 रोजी तत्कालीन राष्ट्रीय गुप्तचर संचालक जेम्स क्लॅपर यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या टॉकिंग पॉइंट्समध्ये स्पष्ट नमूद होते की, परकीय शत्रूंनी अमेरिकन निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी निवडणूक यंत्रणांवर सायबर हल्ले केले नाहीत. याच्या दोन दिवसांनी 9 डिसेंबर 2016 रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे वरिष्ठ सदस्य सहभागी होते. यामध्ये जेम्स क्लॅपर, जॉन ब्रेनन, सुसान राईस, जॉन केरी, लोरेटा लिंच, अँड्र्यू मॅकेब आणि अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचा उद्देश रशियासंबंधीच्या परिस्थितीवर चर्चा करणे हा होता.

advertisement

गुप्तचर यंत्रणेला नवीन रिपोर्ट तयार करण्याचे निर्देश

या बैठकीनंतर जेम्स क्लॅपर यांच्या कार्यकारी सहाय्यकाने इंटेलिजन्स कम्युनिटीच्या प्रमुखांना एक ई-मेल पाठवला. त्यात सांगण्यात आले की, राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या आदेशानुसार एक नवीन गुप्तचर अहवाल तयार करावा. ज्यामध्ये मॉस्कोने 2016ची निवडणूक प्रभावित करण्यासाठी कोणते मार्ग आणि पावले उचलली हे सविस्तर सांगावे.

ई-मेलमध्ये पुढे म्हटले होते की, या उपक्रमाचे नेतृत्व ODNI करेल आणि त्यात CIA, FBI, NSA आणि DHS यांचा सहभाग असेल.

advertisement

DNI गबार्ड यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर ओबामा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती मीडिया संस्थांना लीक केली. यामध्ये 'द वॉशिंग्टन पोस्ट'सारख्या प्रतिष्ठित संस्थांचा समावेश होता. या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला की, रशियाने सायबर पद्धतीने निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

ट्रम्पच्या विजयावर प्रश्नचिन्ह?

6 जानेवारी 2017 रोजी एक नवीन इंटेलिजन्स कम्युनिटी असेसमेंट (ICA) प्रसिद्ध करण्यात आला. हा अहवाल मागील सहा महिन्यांतील IC च्या निष्कर्षांशी पूर्णतः विसंगत होता. अनेक महिन्यांच्या तपासणीनंतर असे समोर आले आहे की, हा नवीन गुप्तचर आढावा अशा माहितीवर आधारित होता. जी माहिती स्वतःच तिच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी किंवा अविश्वसनीय मानली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

प्रेस रिलीजनुसार, हा अहवाल राजकीय हेतूने तयार करण्यात आलेला होता. त्याचा वापर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर शंका घेण्यासाठी, ‘म्युलर चौकशी’सारख्या दीर्घकालीन तपासांसाठी, दोन वेळा महाभियोग रचण्यासाठी, अनेक अधिकाऱ्यांवर चौकशी, अटक आणि तुरुंगवासासाठी, तसेच अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव निर्माण करण्यासाठी केला गेला.

मराठी बातम्या/विदेश/
बराक ओबामांवरील राष्ट्रद्रोहाच्या आरोपाने अमेरिकेत खळबळ, निवडणुकीत कट रचल्याचा गबार्ड यांचा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल