अंकारा: तुर्कस्तानचे C-130 लष्करी मालवाहू विमान अझरबैजानहून उड्डाण केल्यानंतर जॉर्जियामध्ये कोसळले. या दुर्घटनेनंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी “आमच्या शहीदांसाठी संवेदना” व्यक्त केल्या आणि शोध व बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत, अशी माहिती दिली.
advertisement
तुर्की संरक्षण मंत्रालयाने सांगितले की- हा अपघात जॉर्जिया आणि अझरबैजानच्या सीमेजवळ झाला असून तुर्की अधिकारी जॉर्जियन प्रशासनाशी समन्वय साधून दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी कार्यरत आहेत.
अंकारामध्ये भाषण देत असताना एर्दोगान यांना त्यांच्या सहाय्यकांनी या अपघाताची माहिती असलेली चिठ्ठी दिली. भाषण संपवताना त्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. एर्दोगान म्हणाले, देवाच्या कृपेने आपण हा अपघात कमीत कमी नुकसान होईल अशी प्रार्थना करू. शहीदांच्या आत्म्यास शांती लाभो आणि आपण त्यांच्या प्रार्थनेत सहभागी होऊ.
प्रसारमाध्यमांनुसार, विमानामध्ये तुर्की आणि अझरबैजानी लष्करी कर्मचारी होते. मात्र किती जण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एर्दोगान यांच्या कार्यालयाने व संरक्षण मंत्रालयाने अपघाताचे कारण किंवा मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही.
तुर्कीचे गृह मंत्री अली यर्लिकाया यांनी सांगितले की त्यांनी जॉर्जियाचे गृह मंत्री यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असून जॉर्जियन मंत्री स्वतः दुर्घटनास्थळी जात आहेत.
