युक्रेनने क्रीमियामधील किरोव्हस्के लष्करी एअरबेसवर ड्रोन हल्ला करत रशियाचे तीन अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स उध्वस्त केले. यामध्ये Mi-8, Mi-26 आणि Mi-28 या धोकादायक रशियन अटॅक हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. याशिवाय पैंटसिर-S1 एअर डिफेन्स सिस्टमही नष्ट करण्यात आली. युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या (SBU) माहितीनुसार, हा हल्ला संपूर्ण रात्री चालू होता आणि यात रशियाच्या ड्रोन साठवणुकीचे ठिकाण, शस्त्रसाठा आणि एअर डिफेन्स यंत्रणा लक्ष्य करण्यात आल्या.
advertisement
हा प्रतिहल्ला युक्रेनचा F-16 पायलट मॅक्सिम उस्तिमेन्को यांच्या मृत्यूचा सूड होता. उस्तिमेन्को यांनी आपल्या विमानाला वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज दिली. त्यांनी सात हवाई लक्ष्य पाडले पण शेवटच्या ड्रोनला मारताना त्यांचे विमान कोसळले. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी त्यांना मरणोत्तर "हीरो ऑफ युक्रेन" या सर्वोच्च सन्मानाने गौरवले.
यापूर्वीही युक्रेनचा जोरदार हल्ला
27 जून रोजी युक्रेनने रशियाच्या वोल्गोग्राड ओब्लास्टमधील मारिनोव्का एअरबेसवर ड्रोन हल्ला करत चार Su-34 फायटर जेट्सना लक्ष्य केले होते. त्यापैकी दोन पूर्णतः नष्ट झाले तर इतर दोन गंभीररीत्या नुकसानीस पोहोचले. युक्रेनचा दावा आहे की, 2022च्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत रशियाने 420 विमानं आणि 337 हेलिकॉप्टर्स गमावली आहेत. मात्र या आकडेवारीची अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.
राजकीय हालचाली आणि इशारे
दरम्यान, अमेरिका आणि युरोप रशियावर आणखी कठोर निर्बंध लावण्याच्या तयारीत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना रशियाने इशारा दिला आहे की याचा विपरित परिणाम युरोपच्या अर्थव्यवस्थेवरच अधिक होईल. अशातच रशिया आणि अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मागच्या दरवाजाने हालचाली सुरू झाल्या असल्याचे स्पष्ट होत आहे.