TRENDING:

भारत-अमेरिका नात्यात नवा गेम सुरू? क्वाड परिषदेपूर्वी धमाका; फोन कॉलची चर्चा रंगली, जागतिक समीकरणं पुन्हा बदलणार

Last Updated:

India-US Relations: भारत-अमेरिका व्यापार तणाव आणि आयात शुल्काच्या वादामुळे संबंधांमध्ये कटुता आली असली, तरी ट्रम्प आणि मोदी यांची वैयक्तिक मैत्री पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. क्वाड परिषद या नात्यात नवा टर्निंग पॉईंट ठरू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली/वॉशिंग्टन: अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून काहीसे तणावपूर्ण असले तरी दोन्ही देशांचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची मैत्री पुन्हा एकदा रुळावर येणार का, असा प्रश्न सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. भारत-अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव आणि 50 टक्के वाढलेल्या आयात शुल्कामुळे संबंधांमध्ये कटुता आली असली, तरी या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या क्वाड (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग) शिखर परिषदेत संबंध सुधारण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.

advertisement

ट्रम्प यांचे आक्रमक, तर भारताचे संयमी धोरण

ट्रम्प यांनी नुकतेच त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारत-अमेरिका व्यापार संबंधांना एकतर्फी आपत्ती असे संबोधले. त्यांनी भारतावर रशियन तेल खरेदीसाठी २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क आणि एकूण ५० टक्के शुल्क लावल्याचा दावा केला. याउलट भारताने हे शुल्क अनावश्यक आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले. तरीही पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासोबत थेट शब्दयुद्ध टाळले आणि आपली प्रतिक्रिया संयमित ठेवली. मोदींनी या तणावाला आर्थिक स्वार्थ असे संबोधून आपली भूमिका स्पष्ट केली.

advertisement

सोशल मीडियावरील 'मैत्रीचे' संकेत

या तणावादरम्यान शनिवारी ट्रम्प यांनी एक सकारात्मक विधान केले. ते म्हणाले, मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन, ते उत्कृष्ट आहेत आणि भारत-अमेरिका संबंध विशेष आहेत, काळजीचे कोणतेही कारण नाही. यावर प्रत्युत्तर म्हणून, मोदींनीही ट्विट केले की, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सकारात्मक मूल्यांकनाचे आणि भावनांचे कौतुक करतो आणि माझ्या भावनाही त्याच आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात एक सकारात्मक आणि भविष्याभिमुख जागतिक रणनीतिक भागीदारी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दोन्ही नेत्यांमधील हा पहिला संवाद होता, जो केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता.

advertisement

शांत भूमिकेमुळे चर्चेची शक्यता

भारताने आयात शुल्काच्या वादामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत समजूतदार आणि व्यावहारिक पद्धतीने हाताळली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ट्रम्प यांच्यावर कोणतीही कठोर टीका केली नाही. उलट लवकरच परिस्थिती सुधारेल असा विश्वास व्यक्त केला. भारताच्या या संयमित भूमिकेमुळे ट्रम्प यांनाही तणाव कमी करण्याची संधी मिळाली आहे. ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच फोनवर संवाद होण्याची शक्यता वाढली आहे. शेवटची चर्चा त्यांनी १७ जून रोजी केली होती.

advertisement

ट्रम्प यांचा 'क्वाड' परिषदेतील सहभाग अनिश्चित

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार- ट्रम्प यांनी भारत दौऱ्याचा आधी स्वीकार केलेला प्रस्ताव रद्द केला आहे. हा निर्णय व्यापार तणाव आणि रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेची नाराजी दर्शवतो. भारताने संरक्षण सौदे थांबवल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या असल्या तरी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा तणाव क्वाडसारख्या संयुक्त प्रादेशिक उपक्रमांवर परिणाम करू शकतो.

व्यक्तिगत मैत्रीची कसोटी

यापूर्वी ट्रम्प आणि मोदी यांच्यातील व्यक्तिगत मैत्री ही भारत-अमेरिका संबंधांचा एक महत्त्वाचा भाग होती. २०१९ मध्ये ह्युस्टनमध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' आणि २०२० मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या 'नमस्ते ट्रम्प' यांसारख्या कार्यक्रमांनी त्यांची मैत्री जागतिक स्तरावर दाखवून दिली होती. परंतु रशियन तेल आणि भारत-पाकिस्तान मुद्यावर ट्रम्प यांनी केलेल्या विधानांमुळे या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

क्वाड परिषदेत अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया सहभागी आहेत. दोन्ही नेत्यांना संबंध सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकते. भारताची सामरिक स्वायत्तता आणि रशिया-चीनसोबतची भागीदारी यामुळे अमेरिकेत काही प्रमाणात चिंता आहे. पण तरीही दोन्ही देशांमधील संरक्षण, तंत्रज्ञान आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रातील हितसंबंधांमुळे भारत-अमेरिका संबंध दीर्घकाळ मजबूत राहतील.

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही असलेल्या या दोन देशांमधील मैत्री जरी तणावाच्या काळातून जात असली तरी ती अजूनही तुटलेली नाही. येणारे महिने हे ठरवतील की ट्रम्प आणि मोदी यांची व्यक्तिगत मैत्री पुन्हा एकदा भारत-अमेरिका संबंधांचा आधार बनू शकते की नाही.

मराठी बातम्या/विदेश/
भारत-अमेरिका नात्यात नवा गेम सुरू? क्वाड परिषदेपूर्वी धमाका; फोन कॉलची चर्चा रंगली, जागतिक समीकरणं पुन्हा बदलणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल