TRENDING:

डोनाल्ड ट्रम्प यांची जगासमोर अब्रू गेली, अमेरिकन दूतावासाने चेहरा उघडा पडला; भारताला पैसे दिले नाहीत

Last Updated:

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केलेले आरोप उलटे ठरले आणि आंतरराष्ट्रीय पटलावर त्यांची मोठी फजिती झाली. भारताने ठाम पुरावे सादर करत ट्रम्पचा करारा अपमान केल्याचे चित्र जगासमोर उभे राहिले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या खोट्या दाव्यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी असा दावा केला होता की, मतदानाला चालना देण्यासाठी अमेरिकेने भारताला 21 दशलक्ष डॉलर (सुमारे 175 कोटी रुपये) दिले आहेत. यापूर्वीच भारतीय सरकारने हा दावा फेटाळला होता आणि आता दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासानेही लेखी पुष्टी केली आहे की 2014 पासून आतापर्यंत असे कोणतेही पैसे किंवा प्रकल्प झालेला नाही. भारतातील मतदान मोहीम निवडणूक आयोग आणि जनता स्वतःच चालवते. आता सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत, भारतातील मतदान देसी आहे, डॉलरवर अवलंबून नाही, अशा प्रतिक्रिया देत आहेत.
News18
News18
advertisement

ट्रम्प यांचा रेकॉर्ड आहे की जिथे संधी मिळेल तिथे ते आकडे फिरवून सांगतात. कधी हवामान बदलासाठी मिळणारा निधी, कधी नाटोचा खर्च आणि आता भारतातील मतदारांचे कारण. ऐकणाऱ्यांना असे वाटते की ते खूप मोठी गोष्ट सांगत आहेत, पण जेव्हा सत्य समोर येते तेव्हा कळते की त्यांच्या मोठ्या मोठ्या बाता पोकळ आहेत. असेच काहीसे त्यांच्यासोबत भारतात घडले आहे.

advertisement

अमेरिकेच्या दूतावासानेच केला पर्दाफाश

ट्रम्प यांनी नुकताच दावा केला होता की, मतदारांची संख्या वाढवण्यासाठी भारताला USAID (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट) अंतर्गत 21 दशलक्ष डॉलरची मदत देण्यात आली आहे. पण संसदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या लेखी उत्तराने त्यांच्या या दाव्याची हवाच काढली. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या दूतावासाचेच निवेदन सादर केले. दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे की, भारतात असा कोणताही पैसा आलेला नाही आणि USAID/India ने गेल्या दशकात (2014–2024) मतदारांची संख्या वाढवण्यासाठी कोणतीही मोहीम किंवा उपक्रम चालवलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयानेही संसदेत हीच गोष्ट सांगून ट्रम्प यांचे वक्तव्य पोकळ सिद्ध केले.

advertisement

सत्य काय आहे?

भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या काही मोहिमा चालवल्या जातात. त्या सर्व निवडणूक आयोग स्वतःच राबवतो. बाहेरून कोणताही निधी येत नाही. येथील मतदानाचा उत्साह बघायचा असेल तर कोणत्याही मतदान केंद्राबाहेरील रांग बघितली तरी पुरेसे आहे. लोकांना स्वतः तासनतास रांगेत उभे राहतात, त्यासाठी कोणत्याही डॉलरची गरज नाही.

संसदेत हा मुद्दा का गाजला?

advertisement

भारतात परदेशी हस्तक्षेपाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. विरोधी पक्षही निवडणूक आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उभे करतात. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर महत्त्वाचे होते. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारताची लोकशाही कोणत्याही परदेशी निधीवर चालत नाही. येथे मतदानाच्या यशाचे श्रेय केवळ जनता आणि निवडणूक आयोगाला जाते.

सोशल मीडियावर उडवली खिल्ली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर आता ट्विटर आणि फेसबुकवर लोक थट्टा करत आहेत. काही जण लिहित आहेत - ट्रम्प जी, भारतातील मतदानाचा उत्साह देसी आहे, डॉलरमधून नाही. काही जण म्हणत आहेत, आपल्या मतदारांना सांभाळा, भारतातील मतदार स्वतःच रांगेत उभे राहतात. दुसऱ्या एका युजरने लिहिले, भारतात मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या लोकांना पाहून ट्रम्प यांना वाटले असेल की हे सगळे अमेरिकेच्या पैशावर आले आहेत. कमालच आहे!

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
डोनाल्ड ट्रम्प यांची जगासमोर अब्रू गेली, अमेरिकन दूतावासाने चेहरा उघडा पडला; भारताला पैसे दिले नाहीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल