TRENDING:

अमेरिकेचा पाकिस्तानला ‘घातक’ भेटवस्तू, भारतासाठी धोक्याची घंटा; प्राणघातक Missileने दक्षिण आशियात तणाव वाढला

Last Updated:

US-India Relations: अमेरिकेने पाकिस्तानला AIM-120 AMRAAM या प्रगत हवाई-ते-हवाई क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याला मंजुरी दिली आहे. या सौद्यामुळे दक्षिण आशियातील राजकीय समीकरण ढासळण्याची आणि भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला AIM-120 AMRAAM (Advanced Medium-Range Air-to-Air Missile) पुरवठ्याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये अधिक तणाव निर्माण झाला असून पाकिस्तान-अमेरिका संरक्षण सहकार्याला नवे बळ मिळाले आहे.

advertisement

या करारानुसार अमेरिकेची रेथियॉन कंपनी (Raytheon) पाकिस्तानला AIM-120 मिसाइलचे C8 आणि D3 व्हेरिएंट्स पुरवणार आहे. हा करार अंदाजे 2.5 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 21,000 कोटी) असून, या मिसाइलची डिलिव्हरी मे 2030 पर्यंत पूर्ण होणार आहे.

advertisement

हे Missile पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला बळकटी देणार असून विशेषतः भारताशी असलेल्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील सामरिक संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इस्लामाबाद या निर्णयाला Strategic Advantage म्हणून पाहत आहे.

advertisement

AIM-120 AMRAAM ची तांत्रिक वैशिष्ट्ये

>AIM-120 AMRAAM ही ‘फायर अँड फॉरगेट’ प्रकारची आधुनिक हवाई-ते-हवाई (Air-to-Air) Missile आहे. हे Missile अमेरिकन वायुसेनेच्या अत्याधुनिक शस्त्र प्रणालीचा भाग आहे आणि 1991 साली ती प्रथम तैनात करण्यात आली होती.

advertisement

>या Missileमध्ये सक्रिय रडार गाइडन्स सिस्टम आहे. ज्यामुळे ती दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात कार्यक्षम ठरते.

>वजन सुमारे 154 किलो (340 पाउंड) आहे.

>सॉलिड-फ्यूल रॉकेट मोटरमुळे हे Missile सुमारे 4,900 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करू शकते.

>बेसिक व्हेरिएंटची रेंज 50 ते 100 किमी, तर नव्या AIM-120D व्हेरिएंटची रेंज 160 किमीपर्यंत आहे.

>यामध्ये ‘लुक-डाउन, शूट-डाउन’ क्षमता आहे म्हणजे ती खालच्या उंचीवर उडणाऱ्या शत्रूच्या विमानांनाही नष्ट करू शकते.

>GPS-असिस्टेड गाइडन्स आणि डेटा लिंक प्रणालीमुळे हे Missile इलेक्ट्रॉनिक जैमिंगपासून सुरक्षित राहते.

>ती एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते आणि ‘बियॉंड-विज्युअल-रेंज’ (BVR) युद्धासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.

>आतापर्यंत 4,900 हून अधिक टेस्ट फायरिंग्स आणि 13 वास्तविक युद्धांत यशस्वी वापर झाल्याने तिची विश्वसनीयता सिद्ध झाली आहे.

>थेट समोरासमोर (Head-on) हल्ल्यांमध्ये तिचा हिट रेट 90% पेक्षा जास्त आहे.

पाकिस्तानच्या इतर प्रमुख क्षेपणास्त्र प्रणाली

गझनवी-3 (Ghauri-3):

मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक Missile ज्याची रेंज २,५०० किमीपर्यंत आहे. हे Missile भारतासारख्या देशांविरुद्ध तयार करण्यात आली आहे.

शाहीन-3 (Shaheen-3):

पाकिस्तानची सर्वाधिक लांब पल्ल्याची बॅलिस्टिक Missile ज्याची रेंज 2,750 किमीपर्यंत. ते आण्विक हल्ल्यांसाठी सक्षम आहे आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेचा महत्वाचा घटक आहे.

राद-2 (Ra’ad-2):

हवाई प्रक्षेपित क्रूझ Missile (Air-Launched Cruise Missile) रेंज 600 किमीपर्यंत. ती लढाऊ विमानांवरून डागता येते आणि जमीनीवरून ते जमीनीवर हल्ले करण्यास सक्षम आहे.

बाबर क्रूझ मिसाइल (Babur):

अल्प पल्ल्याची क्रूझ Missile ज्याची रेंज 700 किमीपर्यंत. ती विविध युद्ध परिस्थितीत प्रभावीपणे वापरता येते आणि पाकिस्तानच्या रणनीतिक शस्त्रसाठ्याचा महत्त्वाचा भाग आहे.

अमेरिकेची रणनीती

हा करार अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या काळात झालेल्या चर्चांचा भाग असल्याचे मानले जाते. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या वॉशिंग्टन भेटीनंतर या कराराला गती मिळाली. हा सौदा अमेरिकेने नाटो, तैवान आणि इस्रायल यांसारख्या सहयोगींना केलेल्या संरक्षण करारांच्या मालिकेचा भाग आहे.

तज्ज्ञांच्या मते, दक्षिण आशियात चीनच्या वाढत्या प्रभावाला तोलण्यासाठी पाकिस्तानला सामरिकदृष्ट्या बळकटी देणे ही अमेरिकेची मोठी रणनीती आहे. त्याचबरोबर, हा निर्णय भारतावर व्यापार करारांसंदर्भात दबाव टाकण्याचं साधन म्हणूनही पाहिला जातो.

AIM-120 मिसाइल्स पाकिस्तानच्या F-16 विमानांशी पूर्णपणे सुसंगत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानची जुनी F-16 फ्लीट आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होईल.

मुनीर आणि शहबाज यांची रणनीती

भारताशी तणाव वाढल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे वॉशिंग्टनकडे अधिक झुकत आहेत.

ऑपरेशन सिंदूर”मध्ये भारताकडून मोठा धक्का बसल्यानंतर पाकिस्तान आता अमेरिकेच्या बदललेल्या धोरणाचा रणनीतिक फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहे.

त्याअंतर्गत, पाकिस्तान वायुसेना (PAF) आपल्या F-16 स्क्वाड्रन्सचे आधुनिकीकरण करत आहे. AIM-120 मिसाइल्सच्या मदतीने पाकिस्तानला BVR युद्धांमध्ये (दृष्टीच्या पलीकडील हल्ल्यांमध्ये) भारतीय सुखोई-३० MKI आणि राफेलसारख्या विमानांवर आघाडी मिळेल.

दक्षिण आशियात वाढता तणाव

-अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात सुरक्षा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

-पाकिस्तान या मिसाइल्सना आपल्या JF-17 थंडर आणि चीनकडून खरेदी केलेल्या J-10 विमानांसोबत एकत्र करण्याची योजना आखत आहे.

-यामुळे पाकिस्तानची संरक्षण क्षमता जरी वाढेल, तरी त्याची अमेरिकन तंत्रज्ञानावर अवलंबित्वही वाढेल.

-तज्ज्ञांचे मत आहे की या करारामुळे दक्षिण आशियात शस्त्रास्त्रांच्या शर्यतीला (Arms Race) अधिक वेग मिळेल.

-मात्र पाकिस्तान या कराराला आपल्या सुरक्षेचा विस्तार आणि सामरिक विजय म्हणून मांडत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेचा पाकिस्तानला ‘घातक’ भेटवस्तू, भारतासाठी धोक्याची घंटा; प्राणघातक Missileने दक्षिण आशियात तणाव वाढला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल