TRENDING:

‘डबल गेम’नं केली आयुष्याची वाट लावली, 1 कोटी 18 लाख रुपये पगार असताना मेहुलने केला हावरटपणा; आता 15 वर्ष चक्की पीसिंग

Last Updated:

Mehul Goswami: अमेरिकेत भारतीय वंशाचा मेहुल गोस्वामी या अधिकाऱ्याने पैशाच्या हव्यासापोटी दुहेरी नोकरी करून 42 लाख रुपयांची अतिरिक्त कमाई केली. 1 कोटी 18 लाख रुपयांचा पगार असूनही त्याच्या या लोभाने त्याला तुरुंगाच्या दारात नेऊन उभं केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

न्यूयॉर्क: अमेरिकेत भारतीय वंशाचा 39 वर्षीय मेहुल गोस्वामी हा व्यक्ती सध्या चर्चेत आहे. कारण त्याच्यावर मूनलाइटिंग म्हणजेच दुहेरी नोकरी करण्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे आणि या प्रकरणात त्याला 15 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. न्यूयॉर्क राज्यात हे एक गंभीर गुन्हा (Class Felony) मानले जाते. 15 ऑक्टोबर रोजी साराटोगा काउंटी शेरिफ ऑफिसने त्याला “सेकंड डिग्री ग्रँड लार्सनी” म्हणजेच मोठ्या चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मेहुल यांनी सरकारी नोकरी करत असताना खाजगी कंपनीतही काम करून अतिरिक्त कमाई केली.

advertisement

मेहुल गोस्वामी न्यूयॉर्क राज्याच्या ‘ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ या विभागात प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होते. या सरकारी पदावरून त्यांनी 2024 मध्ये सुमारे 1 कोटी 18 लाख रुपये पगार मिळवला होता. परंतु मार्च 2022 मध्ये त्यांनी न्यूयॉर्कजवळील माल्टा येथील ग्लोबल फाउंड्रीज या सेमीकंडक्टर कंपनीतही नोकरी स्वीकारली. त्या वेळी ते सरकारी नोकरीत कायम होते आणि दोन्ही ठिकाणांहून पगार घेत होते. सरकारी नोकरीचे तास चालू असतानाही त्यांनी प्रायव्हेट कंपनीसाठी काम केलं आणि त्यामुळे त्यांनी सुमारे 50,000 डॉलर म्हणजेच अंदाजे 42 लाख रुपये अधिक कमावले.

advertisement

अमेरिकेच्या कायद्यानुसार हे वर्तन “ग्रँड लार्सनी” म्हणजेच मोठ्या प्रमाणात चोरी मानली जाते. कारण त्यांनी करदात्यांच्या पैशाचा आणि सरकारी संसाधनांचा गैरवापर केला. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला पूर्ण वेळ आणि प्रयत्न सार्वजनिक सेवेसाठी द्यायला हवा, पण मेहुल यांनी त्या जबाबदारीचा भंग केला. या प्रकारामुळे जनतेच्या विश्वासाला धक्का बसला आहे. तपास करत असलेल्या इन्स्पेक्टर जनरल ल्युसी लँग यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रामाणिकतेची जबाबदारी असते, आणि मेहुल यांचं वर्तन हे त्या विश्वासाचा गंभीर उल्लंघन आहे. दोन पूर्णवेळ नोकऱ्या करणं म्हणजे सरकारी साधनांचा आणि टॅक्सपेयर्सच्या पैशांचा दुरुपयोग आहे.

advertisement

गोस्वामी यांच्या विरोधातील तपास एका गुप्त ईमेलमुळे सुरू झाला. 2024 मध्ये प्राप्त झालेल्या या ईमेलमध्ये नमूद केलं होतं की, ते सरकारी नोकरीच्या वेळेतच प्रायव्हेट कंपनीसाठीही काम करत आहेत. या माहितीच्या आधारे चौकशी सुरू झाली आणि शेवटी त्यांची अटक करण्यात आली.

मूनलाइटिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मुख्य नोकरीनंतर किंवा मोकळ्या वेळेत दुसऱ्या ठिकाणी काम करणं, जसे की फ्रीलान्सिंग, शिकवणी घेणं किंवा इतर साइड जॉब्स करणं. पूर्वी लोक रात्रीच्या वेळेत, चांदण्याखाली अतिरिक्त काम करत असल्यामुळे या संकल्पनेला “मूनलाइटिंग” असं नाव मिळालं. हे साधारणपणे उत्पन्न वाढवण्यासाठी, कौशल्य वाढवण्यासाठी किंवा वैयक्तिक छंद जोपासण्यासाठी केलं जातं. पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे पूर्णपणे बेकायदेशीर मानलं जातं, कारण त्यातून जबाबदाऱ्या आणि संसाधनांचा गैरवापर होऊ शकतो.

advertisement

भारतामध्ये मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. येथे मूनलाइटिंगला पूर्णपणे बंदी घालणारा कोणताही ठोस कायदा नाही. त्यामुळे हे प्रत्येक कंपनीच्या धोरणांवर अवलंबून असतं. खासगी क्षेत्रातील काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी काम करण्यास मनाई करतात, तर काही ठिकाणी परवानगी दिली जाते. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1964 च्या ‘सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट’नुसार मूनलाइटिंग पूर्णपणे प्रतिबंधित आहे. जर कोणाचं दुसरं काम त्यांच्या मुख्य नोकरीवर परिणाम करत असेल, तर ते शिस्तभंगाचं प्रकरण मानलं जातं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
‘डबल गेम’नं केली आयुष्याची वाट लावली, 1 कोटी 18 लाख रुपये पगार असताना मेहुलने केला हावरटपणा; आता 15 वर्ष चक्की पीसिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल