TRENDING:

व्हेनेझुएलावर हल्ला, पण चर्चा राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीची; मादुरो पेक्षा पॉवरफुल आहे बायको सिलिया फ्लोरेस, इनसाइड स्टोरी

Last Updated:

US Military Operation In Venezuela: व्हेनेझुएलावर अमेरिकेने लष्करी कारवाई केल्याच्या दाव्यानंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासोबतच त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांचे नावही जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. साध्या घरातून सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचलेल्या सिलिया फ्लोरेस या आज व्हेनेझुएलातील सर्वात प्रभावी आणि वादग्रस्त व्यक्तींपैकी एक मानल्या जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

वॉशिंग्टन: व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई केल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना देशाबाहेर हलवण्यात आल्याचे सांगितले आहे. ट्रम्प यांनी Truth Social वर केलेल्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून, त्याचवेळी सिलिया फ्लोरेस या नावाकडेही जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

advertisement

मादुरो यांची पत्नी म्हणून ओळख असली, तरी सिलिया फ्लोरेस या स्वतःच व्हेनेझुएलाच्या सत्ताकेंद्रातील अत्यंत प्रभावी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व मानल्या जातात.

साध्या घरातून सत्तेच्या केंद्रापर्यंत

सिलिया फ्लोरेस यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1956 रोजी व्हेनेझुएलाच्या वायव्य भागातील टिनाक्विलो या छोट्या शहरात झाला. सहा भावंडांमध्ये त्या सर्वात धाकट्या. बालपणात त्यांचे कुटुंब मातीच्या भिंतींच्या आणि मातीच्या जमिनीच्या झोपडीत राहत होते. त्यांचे वडील जवळच्या गावांमध्ये विविध वस्तू विकणारे फिरते व्यापारी होते. पुढे चांगल्या संधींच्या शोधात कुटुंब कराकासमध्ये स्थलांतरित झाले. तिथे फ्लोरेस यांनी एका खासगी विद्यापीठात प्रवेश घेऊन फौजदारी कायद्याचे शिक्षण घेतले.

advertisement

राजकारणापेक्षा कायद्याची वाट

विद्यार्थीदशेत असताना त्यांना राजकारणात फारसा रस नव्हता. त्या अर्धवेळ नोकरी म्हणून एका पोलीस ठाण्यात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम करत. याच काळात त्यांनी एका पोलीस डिटेक्टिव्हशी विवाह केला आणि त्यांना तीन मुलगे झाले. कायदा पदवी मिळाल्यानंतर पुढील जवळपास दहा वर्षे त्या एका खासगी फर्ममध्ये डिफेन्स लॉयर म्हणून काम करत होत्या. त्या टप्प्यावर कोणीही अंदाज बांधला नव्हता की ही महिला पुढे व्हेनेझुएलाच्या सत्तावर्तुळातील प्रमुख शक्ती ठरणार आहे.

advertisement

काराकाझो’ आणि राजकीय जागृती

1989 मध्ये झालेल्या काराकाझो दंगलींनी फ्लोरेस यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. इंधन दरवाढीमुळे उसळलेल्या या हिंसाचाराने कराकास हादरून गेला. नंतर त्यांनी सरकारी दूरदर्शनला सांगितले होते की, या घटनेमुळे त्यांच्या मनात “क्रांतिकारी हाक” जागी झाली.

advertisement

याच घटनांनी त्या काळातील लष्करी अधिकारी ह्यूगो चावेझ यांनाही प्रेरित केले. 1992 मध्ये त्यांनी अयशस्वी उठाव केला. फ्लोरेस चावेझ यांच्या विचारांनी भारावून गेल्या. त्यांनी कराकासच्या भिंतींवर चावेझ यांचे नाव रंगवले आणि पुढे त्यांच्या कायदेशीर बचावासाठी मदत देण्याची ऑफर देत पत्र पाठवले. चावेझ यांनी ही ऑफर स्वीकारली. त्यानंतर फ्लोरेस त्यांच्या सल्लागार बनल्या, समर्थकांची पत्रे हाताळू लागल्या आणि हळूहळू चावेझ यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात सामील झाल्या.

व्हेनेझुएलावरील हल्ला जगाला रडवणार, अमेरिकेने सैतानाला जागे केले; सोने-चांदी...

मादुरोशी ओळख आणि नातेसंबंध

याच काळात फ्लोरेस यांची ओळख कराकासमधील एका कामगार संघटनेच्या नेत्याशी झाली, तो नेता म्हणजे निकोलस मादुरो होय. चावेझ यांना सल्ला देणाऱ्या या दोघांमध्ये जवळीक वाढली. मादुरो यांनी पुढे फ्लोरेस यांचा स्वभाव “ज्वालाग्राही” असल्याचे वर्णन करत, आपण त्यांच्याकडे डोळा मारायला सुरुवात केल्याची आठवण सांगितली होती.

दोघेही आपापल्या वैवाहिक आयुष्यातून बाहेर पडत होते. काही काळातच हे नाते अधिकृत झाले आणि ते जोडीदार बनले.

ट्रम्प यांचा व्हेनेझुएलावर हल्ला; राष्ट्राध्यक्षांसह पत्नीला अटक, देशाबाहेर नेले

चावेझ यांची विश्वासू ते सत्तेची सूत्रधार

1994 मध्ये राष्ट्रपती माफी मिळाल्यानंतर चावेझ यांना सैनिकी प्रतिमा मागे टाकून गरीबांसाठी लढणारा नागरी नेता म्हणून स्वतःला सादर करण्याचा सल्ला फ्लोरेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला. 1997 मध्ये त्या चावेझ यांच्या प्रचार मोहिमेचा भाग बनल्या. पुढील वर्षी चावेझ राष्ट्राध्यक्ष झाले. त्याच काळात मादुरो संसदेत निवडून आले. 2000 मध्ये फ्लोरेस स्वतः नॅशनल असेंब्लीच्या सदस्य झाल्या.

कठोर आणि वादग्रस्त प्रतिमा

संसदेत असताना फ्लोरेस यांनी कडक भूमिका घेतल्याने त्यांची प्रतिमा कठोर नेत्या म्हणून निर्माण झाली. 2007 मध्ये नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना थेट “पापी” असे संबोधले. 2012 मध्ये ह्यूगो चावेझ यांनी त्यांची अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली. मार्च 2013 मध्ये चावेझ यांच्या निधनानंतर निकोलस मादुरो राष्ट्राध्यक्ष झाले. जुलै 2013 मध्ये मादुरो आणि फ्लोरेस यांचा विवाह झाला.

फर्स्ट लेडी ते सत्ताकेंद्र

फर्स्ट लेडी झाल्यानंतर सुरुवातीला फ्लोरेस यांनी राष्ट्रपती भवनातील काही छोट्या बदलांपुरतीच भूमिका मर्यादित ठेवली. मात्र लवकरच त्या निर्णयप्रक्रियेत थेट हस्तक्षेप करू लागल्या. आज त्या केवळ राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी नाहीत, तर व्हेनेझुएलाच्या सत्तेतील एक प्रभावी आणि भीतीदायक शक्ती म्हणून ओळखल्या जातात. म्हणूनच ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर केवळ मादुरो नव्हे, तर सिलिया फ्लोरेस यांच्याबाबतही जागतिक स्तरावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा मकर संक्रांतीला बनवा स्पेशल तीळ पापडी, कमी साहित्यात बनेल खास रेसिपी, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
व्हेनेझुएलावर हल्ला, पण चर्चा राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीची; मादुरो पेक्षा पॉवरफुल आहे बायको सिलिया फ्लोरेस, इनसाइड स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल