व्हेनेझुएलावरील हल्ला जगाला रडवणार, अमेरिकेने सैतानाला जागे केले; सोने-चांदी, क्रूड ऑइल दरात भूकंप

Last Updated:

US Air Strikes On Venezuela: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तणाव वाढला असून त्याचे थेट पडसाद कमोडिटी बाजारावर उमटण्याची शक्यता आहे. सोने-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये तेजी, तर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलातील अनेक ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. कच्च्या तेलापासून ते सोने-चांदीपर्यंत किमतींवर याचा काय परिणाम होऊ शकतो, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. काही तज्ज्ञांचे मत आहे की कच्च्या तेलावर फारसा मोठा परिणाम होणार नाही, कारण व्हेनेझुएलाचा जागतिक तेलपुरवठ्यातील वाटा आधीच मर्यादित आहे. मात्र सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या धातूंमध्ये तेजी येण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
advertisement
बाजार सोमवारी उघडल्यानंतर भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम कमोडिटी बाजारावर दिसून येऊ शकतो, असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सोने-चांदीवर काय परिणाम होऊ शकतो?
Ya Wealth चे डायरेक्टर अनुज गुप्ता यांच्या मते, अमेरिकेच्या कारवाईमुळे भू-राजकीय तणाव वाढला असून त्याचे पडसाद कमोडिटी मार्केटमध्ये उमटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोने, चांदीसह इतर कीमती धातू आणि कच्च्या तेलाची सुरुवात तेजीने होऊ शकते.
advertisement
गुप्ता यांचा अंदाज आहे की COMEX गोल्ड 4,345.50 डॉलर प्रति औंसवरून 4,380 डॉलरपर्यंत जाऊ शकते. चांदी 75 ते 78 डॉलर प्रति औंसच्या रेंजमध्ये व्यवहार करू शकते तर ब्रेंट क्रूड ऑइल 62 ते 65 डॉलर प्रति बॅरलपर्यंत महागू शकते.
advertisement
पुरवठा साखळीवर ताण?
Capital चे सहसंस्थापक संदीप पांडे यांनी सांगितले की, अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षामुळे विशेषतः चांदीच्या निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या शिपिंग मार्गांबाबत चिंता वाढली आहे. यामुळे पुरवठा कमी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर अधिक तेजीच्या स्वरूपात दिसू शकतो.
advertisement
अनुज गुप्ता यांच्या अंदाजानुसार MCX वर सोने 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. चांदी 2,45,000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढू शकते. MCX कच्चे तेल 5,200 ते 5,300 रुपये प्रति बॅरलच्या आसपास राहू शकते.
advertisement
सध्या काय आहेत भाव?
MCX वर चांदी : 2,36,599 रुपये प्रति किलो
आतापर्यंतचा उच्चांक : सुमारे 2.54 लाख रुपये प्रति किलो
सोने (5 फेब्रुवारी वायदा) : 1,35,752 रुपये प्रति 10 ग्रॅम
आतापर्यंतचा उच्चांक : सुमारे 1.40 लाख रुपये
advertisement
जागतिक पातळीवरील तणाव वाढल्यास त्याचा सर्वाधिक फायदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने-चांदीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या धातूंच्या किमतींवर बाजाराची नजर कायम राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
व्हेनेझुएलावरील हल्ला जगाला रडवणार, अमेरिकेने सैतानाला जागे केले; सोने-चांदी, क्रूड ऑइल दरात भूकंप
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement