लंडन: अमेरिकन राजकीय विश्लेषक कॅरल क्रिस्टीन फेअर यांनी पाकिस्तान वंशाच्या ब्रिटीश पत्रकार मोईद पिरझादा यांना दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना “च***या” असे संबोधले. हे ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर फेअर यांनी पुन्हा हा शब्द वापरला आणि ट्रम्प प्रशासनावर व्यापक टीका केली. हिंदीतील या शब्दाचा साधारणपणे अर्थ “मूर्ख” असा होतो.
advertisement
कॅरल क्रिस्टीन फेअर यांनी म्हटले, आतल्या आशावादी व्यक्तीला वाटते की ही ब्युरोक्रसी एकत्र टिकवून ठेवेल. पण निराशावादी व्यक्ती म्हणते, हे सहा महिने झाले आहेत आणि आपल्याला अजून चार वर्षं या च***यासोबत जगायचं आहे. त्यांनी पुढे सांगितले, हा तो शब्द आहे जो मी उर्दूमध्ये वारंवार वापरते आणि माझे अनेक प्रेक्षक त्याला विरोध करतात. पण आता आपण इंग्रजी चर्चेत देखील तो वापरला आहे.
यावर पत्रकार मोईद पिरझादा यांनी प्रत्युत्तर दिले. या च***या शब्दाचे इतके प्रचंड महत्त्व आहे की- अनेकदा परिस्थितीचे वर्णन या शब्दाशिवाय करणे अशक्य होते.
यानंतर कॅरल क्रिस्टीन फेअर म्हणाल्या की त्यांच्या गाडीच्या “लायसन्स प्लेटवरसुद्धा च***या” असे लिहिले आहे. ट्रम्प प्रशासनावर हल्ला चढवत त्या म्हणाल्या- मी ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या क्षमतेबद्दल बोलू शकत नाही. पण दुर्दैवाने त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांना स्वतःच्या क्षेत्रातील तज्ज्ञता नाही. त्यामुळे त्यांना एकमेव निर्णायक शक्ती मानण्याचा मोह होतो.
पण हे लक्षात ठेवायला हवे की- अमेरिकेत गुंतागुंतीची ब्युरोक्रसी आहे आणि गेल्या 25 वर्षांपासून ही ब्युरोक्रसी संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या काळात आम्ही परराष्ट्र मंत्रालयातील हजारो अधिकारी गमावले. त्या तज्ज्ञतेचे नुकसान कुठे झाले. याची माहिती आपल्याला मिळत नाही, असे फेअर यांनी पुढे स्पष्ट केले.
कॅरल क्रिस्टीन फेअर या अमेरिकन राजकीय विश्लेषक असून जॉर्जटाऊन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या दक्षिण आशियातील राजकीय आणि लष्करी घडामोडींमध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी रँड कॉर्पोरेशन, अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रे आणि यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीससोबत काम केले आहे. पाकिस्तानची लष्करी रचना आणि लष्कर-ए-तैय्यबा यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.